Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कृषि विषयातील डिप्लोमा आणि डिग्री धारकांसाठी राज्याच्या ‘या’ कृषि विद्यापीठात निघाली भरती; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

8

VNMKV Recruitment 2023: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भरतीची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आहे. वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow : SRF), आणि यंग प्रोफेशनल (Young Professional 1 : YP1) या दोन पदांच्या प्रत्येकी १ अशा एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२३ आहे.

(फोटो सौजन्य : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अधिकृत वेबसाइट)

पदभरतीचा तपशील :

संस्था : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
नोकरीचे ठिकाण : परभणी

पदांनुसार तपशील :

1. वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow : SRF) : १ जागा
2. यंग प्रोफेशनल (Young Professional 1 : YP1) : १ जागा

एकूण रिक्त पद संख्या : ०२ जागा

(वाचा : Intelligence Bureau Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६७७ पदांसाठी भरती, पात्रता आणि इतर तपशील जाणून घ्या)

वयोमर्यादा :

Vasantrao Naik Marathwada Agriculture University, Parbhani (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी) मधील सिनिअर रिसर्च फेलो आणि यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय २१ वर्षे ते ४५ वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्जाविषयी महत्त्वाचे :

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (अर्जाचा नमूना पहाण्यासाठी येथे क्लिक करा)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑक्टोबर २०२३
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : कापूस संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • निवड प्रक्रिया : मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow : SRF) : कृषी कीटकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (Masters Degree in Agricultural Entomology)

  • यंग प्रोफेशनल (Young Professional 1 : YP1) : बॅचलर पदवी किंवा कृषी विषयातील पदविका (Bachelor Degree or Diploma in Agriculture)

(आवश्यक शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचा)

मिळणारे एवढा पगार :

0 सिनिअर रिसर्च फेलो : ३१ हजार रुपये + HRA (House Rent Allowance)

0 यंग प्रोफेशनल १ : २५ हजार रुपये प्रतिमाह

असा करा अर्ज :

1. या भरती साठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवणे अनिवार्य आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

(वाचा : Ordnance Factory Recruitment 2023: देशाच्या शस्त्र निर्माण कंपनीमध्ये नोकरीची संधी; ट्रेनी पदांसाठी मिळणार एवढा पगार)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.