Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंग्रजी समजतं पण लिहिता बोलता येत नाही? मग या ५ टिप्स जरूर वाचा

13

जागतिकीकरण आणि प्रगत शिक्षण यामुळे जगाच्या सीमा जवळ येत आहे. त्यामुळे आपणही भाषेच्या सीमा ओलांडून अनेक भाषा व्यवहारासाठी अवगत करत आहोत. त्यातली सर्वात महत्वाची भाषा म्हणजे इंग्रजी. हल्ली शाळेपासून ते अगदी करियरच्या कोणत्याही क्षेत्रात केवळ इंग्रजी भाषाच आहे. त्यामुळे आपल्याला इंग्रजी लिहिता, वाचता आणि बोलता येणे ही काळाची गरज झालेली आहे.

इंग्रजी ही खूप अवघड आहे, इंग्रजी भाषा आपल्याला जमू शकत नाही, इंग्रजी म्हणजे खुपच काहीतरी वेगळी भाषा आहे, ती बोलताना आपण चुकलो तर लोक हसतील असे न्यूनगंड अनेकांना असतात. पण त्यावर मात करून इंग्रजीकडे पाहायला हवे. कारण आपण प्रयत्न केले तर इंग्रजी ही एकदम सोपी आणि सहज येणारी भाषा आहे. म्हणूनच ही भाषा कशी आत्मसात करावी याच्या काही खास टिप्स पाहणार आहोत.

वाचन वाढवा: कोणतीही भाषा सरावातून अवगत होत असते. आपण आपल्या मातृभाषेतून लहानपणापासून संवाद साधतो म्हणून त्यात आपण पारंगत असतो. पण भाषा शिकताना त्याची अक्षर ओळख झाली की त्याचे वाचन वाढवणे गरजेचे असते. वाचन केल्याने शब्द समजतात, ते उच्चारले जातात आणि लक्षातही राहतात. केवळ शब्दच नाही तर वाक्य रचना, व्याकरण, काळ याही गोष्टी हळूहळू वाचनातून उलगडत जातात. त्यामुळे इंग्रजी शिकायचे असेल तर त्या भाषेतील पुस्तक, वर्तमानपत्र किंवा कोणतेही साहित्य वाचने गरजेचे आहे.

लेखन सराव महत्वाचा: ज्याप्रमाणे आपण वाचन करू तसे लेखन सराव देखील महत्वाचा आहे. आपण जे वाचतोय त्यातून किमान पाच ते दहा वाक्य तरी रोज लिहून काढली पाहिजेत. लेखनाचा सराव कायम ठेवला तर त्या शब्दांचे अर्थही समजू लागतील. शिवाय समजण्यासोबतच बोलण्यात आणि लिहिण्यात देखील तुम्ही पारंगत व्हाल.

(वाचा: PCMC Recruitment 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीस पदासाठी महाभरती; ३०० हून अधिक जागांसाठी आजच करा अर्ज)

त्या भाषेतून विचार करा: आपण आपल्या भाषेतून विचार करतो म्हणून त्या भाषेतून आपल्याला लिहिता वाचता येते. त्यामुळे इंग्रजी भाषेतून विचार करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या ठिकाणी काही प्रसंग घडला तर तिथे इंग्रजीतून काय बोलल जाईल याचा विचार करा. इंग्रजीतून विचार सुचू लागले की आपसूकच भाषेवर पकड येत जाईल.

नवीन शब्द शोधा: कोणतीही भाषा ही शब्दांचा महासागर असते आणि तुम्ही तेव्हा त्यातले शब्द माहीत करून घेता तेव्हा ती भाषा अधिक सोपी होत जाते. त्यामुळे शब्दांचे ज्ञान वाढवणे खूप गरजेचे आहे. आपल्याकडे अनेक इंग्रजी शब्द संग्रह आहेत, ज्यातून नवीन शब्द शिका. शिकलेल्या शब्दांचा अर्थ समजून घ्या, ते वापरात आणा. कारण तुमच्याकडे शब्दांचे भांडार असले की भाषा सोपी होत जाते.

इंग्रजी माध्यमांचा आधार घ्या: आपण बराच वेळ टीव्ही आणि सोशल मीडियावर असतो अशा वेळी देखील आपण इंग्रजी शिकू शकतो. त्यासाठी इंग्रजी भाषेतून खेळाची कॉमेंट्री समजून घ्या. इंग्रजी गाणी, सिनेमा याचा आधार घ्या. इंग्रजी भाषेतील मुलाखती ऐका. फोनवर चॅटिंग करताना, बोलताना इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करा. या काही टिप्स जर तुम्ही आवर्जून फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता.

(वाचा: PGCIL Recruitment 2023: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ‘एलएलबी’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व तपशील)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.