Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सध्या हीच अवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण अशावेळी रागाने तडकाफडकी नोकरी सोडण्यापेक्षा खूप विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असते. कारण कुटुंबाचा आर्थिक डोलारा नोकरीवर अवलंबून असल्याने याच्याशी अनेक गोष्टी निगडीत असतात. अशी अवस्था जेव्हा येते, तेव्हा या पाच गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. त्याविषयीच सविस्तर माहिती घेऊया.
कारणे शोधा: नोकरीचा ताण आला असेल, नोकरी सोडावी वाटत असेल तर त्याची कारणे शोधा. तुम्हाला वरिष्ठांचा त्रास आहे, सहकार्यांनशी पटत नाहीय का, कामाचा अधिक भार दिला जात आहे का, तुमच्याकडून काही चुकतय का, वरिष्ठांच्या मनासारखे काम तुमच्याकडून होत नाहीय का? अशी अनेक कारणे यामध्ये असू शकतात. त्या कारणांचा शोध घ्या. आणि त्या करणांवर कशी मात करता येईल, त्यातून काही मार्ग काढता येईल का यावर विचार करा.
स्वतःमध्ये बदल आवश्यक: नोकरीच्या ठिकाणी कुठेही गेला तरी सगळीकडे आपल्या मनासारखी माणसे मिळतील असे नाही. त्यामुळे नोकरी आहे तोवर संघर्ष सुरू असतो. म्हणूनच अनेकदा स्वतःमध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. आपल्यातील त्रुटी लक्षात घेऊन त्यावर मात करा. कामाच्या बाबतीत आवश्यक असणारी सर्व कौशल्य अवगत करा, तांत्रिक दृष्ट्या देखील सक्षम व्हा. आपम्न ज्या पदावर आहोत त्या पदाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचे पूर्ण योगदान दिले तर परिस्थिती नक्कीच सकारात्मक होऊ शकते.
(वाचा: CRIS Recruitment 2023 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्र येथे मोठी भरती, ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)
चर्चेतून मार्ग काढा: नोकरी सोडण्याआधी शेवटचा पर्याय म्हणजे चर्चा आणि त्यातून मार्ग काढणे. आपल्याला जो काही त्रास असेल, जे काही मनात असेल तर शांतपणे आपल्या वरिष्ठांशी बोला. आपले म्हणणे त्यांना पटवून द्या. त्यातूनही तोडगा नाहीच निघाला तर ऑफिसमध्ये एचआर हे अशा गोष्टींवर मार्ग काढतात. त्यामुळे त्यांच्याशी बोला, सर्व परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्या.
आर्थिक गोष्टी लक्षात घ्या: नोकरी सोडणे खूप सोपे आहे. पण त्यानंतरचा काळ कसा असेल याचा विचार करा. नोकरीननंतर तुमचा घरखर्च कसा चालेल, त्याव्यतिरिक्त असलेल्या आर्थिक गोष्टी, आजारपण, घरातील मुलांचे शिक्षण, काही व्यवहार, कर्जाचे हफ्ते याचा विचार करा. त्याची तरतूद होईपर्यंत आहे त्याच ठिकाणी काम करा. किंवा आर्थिक व्यवस्थापन करा. जर तुम्ही नोकरी सोडूनही किमान सहा महीने तुमचे जीवन सुरळीत चालणार असेल तरच नोकरीच सोडण्याचा विचार करा.
भक्कम पर्याय शोधा: हे सगळे पर्याय करूनही जर काहीच फरक पडत नसेल. तर मनाविरुद्ध काम करण्याची अजिबात गरज नाही. कारण क्षमतेपेक्षा अधिक मानसिक तनावही शरीराला घातक ठरू शकतो. त्यामुळे नोकरी सोडण्याआधी दुसरी नोकरी हातात नसेल तर पुढच्या सहा महिन्यांचे आर्थिक व्यवस्थापन करा. किंवा आता जी नोकरी आहे त्यापेक्षा अधिक चांगली आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणारी नोकरी शोधा. किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यावर सखोल अभ्यास करून, त्याचे भांडवल, मार्केटिंग, जागा याची पूर्वतयारी करून आहे त्या नोकरला निरोप द्या.
(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या ‘सायन हॉस्पिटल’ मध्ये भरती; ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज)