Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडमध्ये भरती; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला १० दिवसांची मुभा, असा करा अर्ज

11

Pune Banking Jobs 2023 : पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी काल (शुक्रवार, १९ डिसेंबर २०२३) ला जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विधी अधिकारी, संगणक अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२३ आहे. उमेदवारांनी पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवरील अर्जाचा नमूना डाउनलोड करून अर्ज करायचा आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड (Pune People’s Co.-Operative Bank Ltd. Pune)

भरली जाणारी पदे :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)
  • व्यवस्थापक (General Manager)
  • मुख्य कायदा अधिकारी (Cheif Law Officer)
  • उप. व्यवस्थापक (Deputy General Manager)
  • सहाय्यक व्यवस्थापक (Assistant General Manager)
  • शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
  • विधी अधिकारी (Legal Officer)
  • संगणक अधिकारी (Computer Officer)

अर्ज करण्याची पद्धत : संपूर्णपणे ऑफलाइन

UCO Bank Bharti 2023 : यूको बँकेमध्ये भरतीसाठी देशभरातील उमेदवार करू शकणार अर्ज; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ डिसेंबर २०२३ (अर्ज प्रसिद्धीच्या १० दिवसांमध्ये)

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड, हेड ऑफिस : ४७७ / ४७८, पहिला मजला, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११०३७

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
मुख्य कार्यकारी अधिकारी Graduate with CAIIB, DBF, DCBM / or C.A./ICWA or Post Graduate in any discipline with a minimum of 15 years of banking experience, out of which a minimum 8 years experience at the middle/senior level management ४५ वर्ष
व्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA / CAIIB / ICWA. Minimum Experience of 10 years as Dy. General Manager / Assistant General Manager in a Cooperative or Nationalized Bank ४५ वर्ष
मुख्य कायदा अधिकारी Graduate/Post Graduate in Law (LLB/LLM). He should have particle experience in court attendance and have presented and argued the cases for about 15 years. ४५ वर्ष
उप.व्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB. Minimum Experience of 7 years as an Assistant General Manager in a Cooperative or Nationalized Bank. Experience of working in maximum/all departments of the Bank is necessary ४५ वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB. Minimum Experience of 7 years at a higher level position in the Head Office of a Cooperative or Nationalized Bank. Experience of working in maximum/all departments of the Bank is necessary ४५ वर्ष
शाखा व्यवस्थापक Graduate/Post Graduate, MBA/CAIIB. Minimum Experience of 7 years as a Branch Manager / Senior Officer in a Co-operative or Nationalized Bank ३५ वर्ष
विधी अधिकारी Graduate/Post Graduate in Law (LLB/LLM). At least 10 years experience as a practicing Advocate/ worked as an Executive in any Bank /any financial institution handling Legal portfolio related to recovery matters ४० वर्ष
संगणक अधिकारी Graduate/Post Graduate in Computers BE/BCA/MCA/BCS/MCS. Minimum Experience of 5 years in any Bank /any financial institution. Knowledge of handling Software/ Hardware portfolio ३५ वर्ष

पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडमधील भरतीसाठी असा करा अर्ज :1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा. कारण, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करावेत; अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२३ आहे.
5. वरील तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स :
० अधिक माहितीसाठी वाचण्यासाठी मूळ जाहिराती पाहा.

० अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा.

० पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

SBI CBO Recruitment 2023 : एसबीआयमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पद भरती; तीन टप्प्यात पार पडणार निवड प्रक्रिया

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.