Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गोव्यातील मद्याची तस्करी करणारा आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाच्या जाळ्यात; पुण्यात 82 लाखांचा गोव्यातील मद्यसाठा जप्त
पुणे,दि.२०:- गोव्याहून पुण्यात आणलेला मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूरजवळ पकडला. या कारवाईमध्ये ८२ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या साठा जप्त करण्यात आल्या.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त केला आहे व ट्रकचालकाला अटक केली.
विपुल देवीलाल नट (वय ३२, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गोव्यातील मद्य अन्य राज्यात विक्रीस मनाई करण्यात आली आहे. गोव्यातील मद्याचा साठा पुण्यात पाठवण्यात आल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा लावला होता. मंगळवारी पहाटे साताऱ्याहून पुण्याकडे ट्रक निघाला होता. पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ट्रक अडवला. ट्रक चालकाकडे ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली. त्याने औषधांची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यातील खाेक्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या. व महाराष्ट्र दारूबंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.