Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त १२ हजारांमध्ये भारतात आला Realme C67 5G; ६जीबी रॅमसह मिळतोय ५० एमपीचा कॅमेरा

6

रियलमीनं 5G स्मार्टफोन रेंजचा विस्तार करत सी-सीरीजमध्ये Realme C67 5G सादर केला आहे. डिव्हाइसमध्ये युजर्सना ६.७२ इंचाचा एचडी + डिस्प्ले, ५० मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा, ६जीबी रॅम, ५०००एमएएचची बॅटरी, मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेट असे अनेक फीचर्स सादर करण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊया मोबाइलचे फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची संपूर्ण माहिती.

Realme C67 5G Price In India

Realme C67 5G स्मार्टफोन दोन स्टोरज मध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. डिवाइसच्या ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेजची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर फोनचा ६जीबी रॅम व १२८जीबी मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये आहे. फोनसाठी युजर्सना सनी ओएसिस आणि डार्क पर्पल सारखे दोन कलर मिळतील. ह्याची विक्री रियलमी वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन मोडवर २० डिसेंबर पासून सुरु होईल. तर १६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता रियलमी वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर फ्लॅश सेल केली जाईल. ज्यात ग्राहक २,००० रुपयांचा लाँच ऑफर डिस्काउंट मिळवू शकतात.

Realme C67 5G Specifications

Realme C67 5G मोबाइलमध्ये ६.७२-इंचाचा FHD+ IPS LCD देण्यात आला आहे. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, २४०० X १०८० पिक्सल रिजोल्यूशन, ९१.४० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि ६८०निट्स ब्राइटनेस मिळते. हा नवीन फोन अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय ४.० वर चालतो.

स्मार्टफोनमध्ये ब्रँडनं मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी५७ एमसी२ जीपीयू जोडण्यात आला आहे. सोबत ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर ६जीबी पर्यंत डायनॅमिक रॅमचा सपोर्ट पण आहे.

कॅमेरा फीचर्स पाहता Realme C67 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५०मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme C67 5G मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी आहे जी ३३वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम ५जी, ४जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ ५.२ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.