Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- ईडीच्या नोटीसनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया.
- आज संध्याकाळी ईडीची नोटीस प्राप्त झाल्याचे केले स्पष्ट.
- नोटीसमध्ये कोणतेही कारण दिले नसल्याचा केला दावा.
वाचा:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट?; सीबीआयने दिले स्पष्टीकरण
ईडीने अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे. अशी नोटीस मिळाल्याच्या माहितीला अनिल परब यांनीही दुजोरा दिला व माध्यमांकडे याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. ईडीने मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्याला उत्तरही कायदेशीररित्या दिले जाईल, असे सांगत अनिल परब यांनी महत्त्वाचा दावा केला. ‘ईडीची नोटीस आज संध्याकाळी मला मिळाली. या नोटीसमध्ये सविस्तर काहीच लिहिण्यात आलेले नाही. कोणत्या प्रकरणात ही नोटीस आहे त्याचाही उल्लेख केला गेलेला नाही. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आपण आमच्या कार्यालयात हजर व्हावे इतकाच उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे कशासाठी ही नोटीस आहे हे आता मलाही सांगता येणार नाही’, असे परब यांनी सांगितले.
वाचा:ठाकरे सरकारला धक्का! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
‘असं काहीतरी होईल हे आम्हाला अपेक्षितच होते. त्यामुळे आता नोटीस आल्यावर त्याला सामोरे जावे लागेल. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर दिले जाईल. ज्यावेळी ही नोटीस नेमकी कशासाठी बजावली ते कळेल तेव्हाच त्याला उत्तर देता येईल. यावर आताच अधिक काही बोलता येणार नाही’, असेही परब यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट सचिन वाझे याला दिल्याचा आरोप झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हा आरोप केला आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू असून याच प्रकरणात ईडीने आता अनिल परब यांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचा:अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील!; अजित पवार यांचा थेट इशारा