Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रोहित पवारांचा दे धक्का, चंद्रकांत पाटलांची पाठ फिरताच ‘यांचा’ भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश

16

हायलाइट्स:

  • कर्जतमधील नगरसेवकांसह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
  • चंद्रकांत पाटील रविवारी कर्जतहून जाताच कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष.
  • यापूर्वी जामखेडमध्येही अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आहे प्रवेश.

अहमदनगर: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला धक्के देणे सुरूच ठेवले आहे. भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत जिंकण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे डावपेच सुरू आहेत. सोमवारी कर्जतमधील नगरसेवकांसह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकेकाळी हे कार्यकर्त माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे समर्थक होते. (bjp workers join ncp in the presence of rohit pawar in ahmednagar)

विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी कर्जत तालुक्यात खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांची पाठ फिरताच कर्जत नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक नितीन तोरडमल, लालासाहेब शेळके, भाजपचे जिल्हा संघटन सचिव पदाचा राजीनामा दिलेले प्रसाद ढोकरीकर तसेच देविदास खरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यात हडपसर येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. पवार यांनी या सर्वांचे पाक्षात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल तनपुरे, संतोष नलावडे उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- ‘ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन”; करीट सोमय्यांचे ‘या’ ११ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

पक्षप्रवेश केलेले ढोकरीकर भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते होते. अलीकडचे त्यांनी त्यांच्या खासगी शिक्षण संस्थेत आमदार पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून पक्ष पातळीवर गंभीर दखल घेतली गेल्याने त्यांना पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. आता त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार?; ‘या’ मंत्र्याने केले मोठे वक्तव्य

यापूर्वी जामखेडमध्येही अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मधल्या काळात जामखेड नगरपालिकेतील नगरसेवकांनीही पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आता कर्जतमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले आहे. या दोन्ही ठिकाणच्या नगरपालिकांची मुदत संपली असून लवकरच निवडणुका होणार आहेत. यावेळी भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे स्वरूप असले तरी खरी लढत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशीच होणार आहे. त्यामध्ये आतापासूनच चुरस निर्माण झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- योग्य वेळी सीडी लावणार, ती पोलिसांकडे दिली आहे; खडसे यांचा इशारा

शेलार यांनी सांगितले, ‘भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले सर्वजण कुठलीही अट न ठेवता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आले आहेत. शहरात रोज विकास कामे सुरू होत आहेत. यामुळे या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी या सर्वांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे,’ असेही शेलार यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.