Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

8


खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी




खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

धाराशिव (प्रतिनिधी) – संतोषने आसिफकडून घर बांधण्यासाठी २०२० मध्ये १५ लाख रुपये घेतले होते. दोघात कासारशिरसी (ता. निलंगा) येथे अवैध पत्त्याचा क्लब सुरु होता. यात आणखी काही भागीदार होते. एका गुन्ह्यातील प्रकरणात संतोष व आसिफ उमरगा न्यायालयात मंगळवारी तारखेला आले होते. दुपारी दोघे न्यायालयातून खाली लघुशंकेसाठी आले. त्यानंतर आसिफ पुन्हा न्यायालयात गेला नाही. दरम्यान, क्लबमधील ग्राहकाचे चिटींग केल्यामुळे व आसिफने दिलेले पंधरा लाख रुपये परत मागितल्याने तुरोरी गावाजवळ हाय वे रोडच्या कडेला असलेल्या नाल्यात आसिफ खान याचे प्रेत पडलेले दिसले, त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार केल्याने त्यास गंभीर जखमा होवुन रक्त निघुन तो मरण पावल्याचे तसेच त्याच्या अंगावर असलेले फिक्कट गुलाबी रंगाचे शर्ट नव्हते, त्याचे पायातील एकच बुट तेथे पडलेले होते. त्या नंतर पंचनामा करून प्रेत सरकारी दवाखाना उमरगा येथे पी.एम करण्यासाठी घेवुन गेले. या प्रकरणी मयताचा भाऊ उमर मुस्तफा खान (वय २७ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष म्हेत्रे ऊर्फ पॉपकॉर्न याच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम २०१ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

मोठा भाऊ आरीफ याला फोन करून १०:०० वा. आपणास उमरगा येथे तक्रार देण्यासाठी जायचे आहे तु अंघोळ करून तयार हो असे सांगितले. त्यानंतर मी पण अंघोळपाणी करून तयार होत असताना सकाळी १०:३० वा.चे. सुमारास माझ्या आईचे मोबाईलवर भाऊ आसिफ याचे फोन चालु झाले बाबत मेसेज आल्याने माझी आई आसिफ याचे फोनवर कॉल केले असता उमरगा पोलीसांनी आसिफचे फोन उचलुन आईला भाऊ आसिफचे अपघात झाल्याचे सांगीतले. त्यानंतर लगेच परत भावाचे मोबाईलवर फोन केले असता मला उमरगा पोलीसांनी तुरोरी गावाजवळ भाऊ आसिफ हा मयत झाल्याचे व तुम्ही तात्काळ तुरोरी गावाजवळ या असे कळविल्याने मी, भाऊ आरीफ व माझे मित्र असे मिळुन घटनास्थळी गेलो.

चार दिवसांपूर्वी सोलापूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील कराळी पाटी येथे एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. फिर्यादीच्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री एका विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला उमरगा पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता, १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोलापूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गवरील कराळी पाटी येथे मंगळवार, (दि.९ जानेवारी) रोजी सकाळी एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मयताच्या डोक्यात गंभीर जखमा होत्या. तपासाअंती मयताचे नाव असीफ मुस्तफा खान (वय ३७, रा. १७-७४ आगड गल्ली (जहीरपेठ) वीरभद्रेश्वर मंदिराजवळ हुमनाबाद (जि. बिदर, कर्नाटक) असे निष्पन्न झाले. याप्रकरणी असिफ मुस्तफा खान याचा भाऊ उमर खान यांच्या फिर्यादीनुसार संतोष पापन (रा. डॉक्टर कॉलनी, हुमनाबाद, जि.बिदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेवटी त्याला अटक करण्यात आली असून १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हा खून आर्थिक देवाण-घेवाणमधून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, हा खून एकटा व्यक्ती कसा करू शकतो? खून करून प्रेत राष्ट्रीय महामार्गालगत का आणून टाकण्यात आले? या खून प्रकरणी अजून किती आरोपी आहेत ? असल्यास त्यांना कधी अटक होणार ? या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासाअंती मिळणार आहेत. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.