Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हृतिकच्या ‘फायटर’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई, वीकेंडला गाजवणार बॉक्स ऑफिस?

11

मुंबई– प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हृतिक रोशनचा फायटर हा सिनेमा रिलीज झाला आहे. तो यापूर्वी शेवटी २०२१ मध्ये रिलीज झालेल्या विक्रम वेधा या सिनेमात दिसलेला. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर झालेल्या हवाई हल्ल्यावर आधारित हा नवीन चित्रपट लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाला धक्का बसला. पाकिस्तान सैन्याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिल्याचे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

गर्लफ्रेंडसोबत हृतिक एअरपोर्टवर स्पॉट

या चित्रपटातील आकाशात भिडणाऱ्या ॲक्शन सीन्सने चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा अभिनय असलेल्या या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने चांगली ओपनिंग केली आहे.

हृतिक रोशनच्या या चित्रपटाने त्याच्या मागील ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा ओपनिंगचा (१०.५८ कोटी) विक्रम मोडला आहे, परंतु हा सिनेमा इतर सिनेमांच्या तुलनेत उत्तम ओपनिंग करु शकला नाही. हृतिकच्या ‘वॉर’ या चित्रपटाने ५१.६ कोटी रुपयांची (हिंदी) सुरुवात केली होती. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘क्रिश ३’ या चित्रपटाने २५.५० कोटींची कमाई केली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’, ‘जवान’, ‘ॲनिमल’ आणि ‘गदर २’ यांसारख्या हिट चित्रपटांशी हृतिकच्या या चित्रपटाची तुलना केली, तर ‘फायटर’ ओपनिंगच्या बाबतीत खूपच मागे पडला आहे.

कला विश्वातील दिग्गजांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान, चिरंजीवीसोबत मिथुन चक्रवर्ती मानकरी
पहिल्या दिवशी देशभरात २२ कोटींचे कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार, ‘Fighter’ ने पहिल्या दिवशी २,७९,३६७ तिकिटे विकली आणि सुमारे ८.४ कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग केली. गुरुवार, २५ जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे २२.०० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. हा चित्रपट जगभरात उत्तम कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे.

लग्नानंतर परिणितीने बदलली करिअरची दिशा, आता अभिनय नाही तर या क्षेत्रात करणार पदार्पण
‘फायटर’ जवळपास ४२०० स्क्रीन्सवर रिलीज

हा चित्रपट २D, ‘३D, IMAX ३D, ४DX ३D, ICE ३D आणि IMAX २D मध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट सुमारे २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचे म्हटले जाते. सिनेमा देशभरातील सुमारे ४२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूश

चित्रपट पाहून आलेल्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशनचे काम पाहून प्रेक्षक खूप खूश झाले आहेत. प्रत्येकाने हा देशभक्तीपर चित्रपट पाहावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.