Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जुगार अड्डयावर सिंदी रेल्वे पोलिसांचा छापा,८ आरोपींसह १लक्ष५५ हजार रु चा मुद्देमाल जप्त…..
सिॅदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३/२/२४ च्या संध्याकाळी ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने या दैनंदिन कार्यालईन कामकाज करीत असतांना संध्याकाळी ६.०० ते ७.३० वा चे दरम्यान गुप्त बातमीद्वारा मार्फत गुप्त बातमी मिळाली की पोलिस स्टेशन हद्दीत सिॅदी रेल्वे वार्ड क्रमांक ५ येथे राहनारा ईसम हेमंत रामचंद्र पाटील हा त्याचे आर्थिक फायद्याकरीता ईतर काही मंडळींना घेऊन ५२ तासपत्तीवर हारजीत जुगार खेळवतोय अशा गुप्त माहीतीवरुन पोलिस स्टेशनला उपस्थित पथकासह ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता त्या ठिकाणी
आरोपी –
१) हेमंत रामचंद्र पाटील, वय ४७ वर्ष, रा. वार्ड नं. ५, सिंदी रेल्वे,
२) उमेश मारोतराव नखाते, वय ५२ वर्ष, रा. पळसगाव बाई,
३) मंगेश बबनराव बेलखोडे, वय ३२ वर्ष, रा. वॉर्ड नं. १६, सिंदी रेल्वे
४) शरद ज्ञानेश्वर तळवेकर, वय ५२ वर्ष, रा. वॉर्ड नं. ५, सिंदी रेल्वे
५) मुकेश नारायणराव ढोक, वय ५५ वर्ष, रा. वार्ड नं. १७, सिंदीरेल्वे,
६) मनोज ज्ञानेश्वर देवतळे, वय ४५ वर्ष, रा. पळसगांव बाई,
७) रवींद्र केशवराव बेलखोडे, वय ३९ वर्ष, रा. वार्ड नं. १६,सिंदी रेल्वे,
८) संदीप गोविंदराव दुप्पलवार, वय ४८ वर्ष, रा.वार्ड नं. १७,सिंदी रेल्वे
यांना सर्वाची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ व डावावर लावलेले नगदी ५१००/- रू. तास पत्ते किंमत ५०/- रू.तसेच चार आरोपीची मोटरसायकल एकूण किं. १०५००००/-रू. असा एकूण मुद्देमाल किंमत १०५५१००/-रू मिळून आला
या सर्वांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन येऱ्थे आणुन त्यांचेवर अपराध क्र.३०/२०२४, कलम ४,५ म.जू.का. अन्वये गुन्हा नोंद करुन सर्व आरोपींना सुचनापत्रावर सक्त ताकीद देऊन सोडुन देण्यात आले पुढील तपास पोलिस उपनि श्यामसुंदर सुर्यवंशी हे करत आहेत
सदरची यशस्वी कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार वंदना सोनुने,पोउपनि निकम,सफौ चांदेकर,पोहवा भगत,पोशि मुन,सचिन उईके,मपोशि प्रिती चन्ने यांनी केली