Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मंडळी, यंदा संत्री मिळणार का?
- विदर्भातील संत्र्याला गळन व शंखअळीचा प्रादुर्भाव
- हातातोंडाशी आलेल्या लाखो रुपयाचा संत्रा हातातून जाण्याची शक्यता
सातत्याने सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले असतानाच तिकडे या पावसाचा फटका फळबागांना ही बसत आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे संत्रा झाडांवर ही विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मागील तीन महिन्यांपासून संत्राची गळती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या लाखो रुपयाचा संत्रा हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.
सध्या संत्राला आंबिया बहार आला आहे. दरवर्षी प्रमाने यंदाही या शेतकऱ्यांनी संत्रा बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. हजारो खर्च करून फवारणी या शेतकऱ्यानी केली परंतु यंदाही जुलै महिन्यापासून संत्रा गळतिला सुरवात झाल्याने निम्यापेक्षा जास्त संत्राची फळे हे गळून पडले आहेत. त्यामुळे लावलेले पैसे ही निघनार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहला आहे. अमरावती जिल्ह्यातील बहादा येथील संत्रा उत्पादक शेतकरी भाऊराव वानखडे यांच्याकडे १३०० संत्रा झाडे आहेत. मात्र, यंदा१२ ते १३ लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं मात्र संत्रा गळन व शंखअळीने त्यांच उत्पन्न पूर्णपणे घटनार आहे तर यावर उपाय योजना कृषी विभागाने करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर संत्रा गळती होते. परंतु यावर कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संत्रा बागांमध्ये फिरकतही नसल्याचा आरोप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे शासनाकडून संत्रा उत्पादन उत्पादनावर उपाययोजना केल्या जातील असे सांगितले जाते. परंतु वास्तविकता मात्र कृषी विभागाकडून कुठलाच मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रारही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
संत्रा बागांमध्ये संत्रा गळती बरोबरच शंकू अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. या शंखू अळी मुळे संत्रा झाडांच्या साली खराब होत असून संत्रा झाडांच आयुष्यही कमी होत आहे. संत्रा झाडा वरील शंखु अळी वेचण्यासाठी प्रचंड खर्चही येत असल्याच संत्रा उत्पादक शेतकरी सांगतात.