Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले; श्री. मार्तंड देवस्थानचे स्पष्टीकरण

5

हायलाइट्स:

  • श्री, मार्तंड देवस्थानाच्या जमिनीवर राजकीय हस्तक्षेप वा ताबा नाही- श्री. मार्तंड देवस्थान.
  • कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत- देवस्थानाचे आवाहन.
  • भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले होते जमिनीवरील राजकीय हस्तक्षेप आणि ताब्याबाबत आरोप.

पुणे: जेजुरी येथील श्री. मार्तंड देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा ताबा नसून कृपया देवस्थानाच्या कामामध्ये कोणीही राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. मार्तंड देवस्थानने या जमिनींवर राजकीय ताबा असण्याच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व जमिनी देवस्थानाच्या मालकीच्या असून त्या-त्या गावातील शेतकरी या जागांमध्ये वहिवाटीत आहेत. शोध घेतलेल्या जमिनींबाबत देवस्थान नि:पक्षपातीपणे काम करत आहे. तरी कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत, अशी विनंती श्री. मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने केली आहे. देवस्थानाच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पडळकर यांच्या या आरोपांवर श्री. मार्तंड देवस्थानाने आपले म्हणणे मांडले आहे. (no one should make irresponsible statements for political reasons says shri martand devasthan jejuri on statement by mla gopichand padlkar)

‘कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत’

जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थाना मालकीच्या खेड तालु्क्यातील चाकण, पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, इंदापूर तालुक्यातील सणसर व तरंगवाडी, फलटण तालुक्यातील गिरवी व सांगवी आणि सातारा तालु्क्यातील देगाव व लिंब येथे जमिनी आढळून आलेल्या आहेत. या सर्व जमिनी देवसंस्थानाच्या मालकीच्या आहेत. काही शेतकऱ्यांनी देवसंस्थानाशी संपर्क देखील साधलेला आहे,असे स्पष्ट करतानाच देवसंस्थान हे धार्मिक न्यास आहे, तरी याबाबत कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नयेत, अशी विनंती श्री मार्तंड देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त पंकज एकनाथ निकुडे पाटील यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: न्यायालयात ३० सप्टेंबर रोजी पुरावे सादर होणार

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता ‘काका-पुतण्या’ असा उल्लेख करत टीका केली आहे. पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत या १३३ एकर जमिनीवर कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला होता. लवकरच हे जगापुढे उघड होईल, असेही पडळकर यांनी म्हटले आहे. मात्र, श्री. मार्तंड देवस्थानाने पडळकर यांचे हे आरोप बेजबाबदारपणे केलेले असल्याचे म्हणत ते फेटाळून लावले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- परप्रांतीयांची नोंद ठेवा; ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवा: मुख्यमंत्री
क्लिक करा आणि वाचा- गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच का? शिवसेनेचे पंतप्रधानांवर शरसंधान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.