Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१५सप्टें.रोजी प्रभाग क्र.८मध्ये साफसफाई व वृक्षारोपण

6

(शैलेश चौधरी)

एरंडोल: येथे नगरपालिकेतर्फे मागच्या बुधवार पासून एका प्रभागातील साफसफाई व वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मागल्या बुधवारी प्रभाग क्रमांक ९मध्ये स्वच्छतामोहीम घेण्यात आली. तर १५सप्टें.रोजीच्या बुधवारी प्रभाग क्रमांक मधील गटारी,रस्ते व खुल्या जागेची साफसफाई करण्यात आली.
नगरसेवक नितीन चौधरी व नगरसेवीका बानोबी गुलाब बागवान यांच्या घरापासून त्यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
या मोहीमेअंतर्गत पाताळ नगरी,भोई गल्ली,भावसार गल्ली व मुजावर वाडा इ. प्रमुख परीसर स्वच्छ करण्यात आला व जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली.
मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी,आरोग्य निरीक्षक अनिल महाजन,आनंद दाभाडे,देवेंद्र शिंदे,डॉ.अजीत भट,विवेक कोळी,विनोद पाटील,भूषण महाजन,महेंद्र पाटील,डॉ. योगेश सुकटे,सौरभ बागड आदी अधिकारी व कर्मचार्यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.