Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनात इंधन भरले आणि फसले,आर्णी येथील सराफावरच्या दरोड्याचा दोन दिवसात स्थागुशा ने केला उलगडा….

8

स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसाचे आत उघड केला धाडसी जबरी चोरीचा गुन्हा,पोलिस ठाणे आर्णी येथील गुन्ह्यांत चार आरोपींसह २५,१२,३००/- रु मुद्देमाल केला जप्त….

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी जुन्या आर्णी परिसरात राहणारे फिर्यादी सराफा व्यापारी  विशाल देवीदास लोळणे हे आपले सदोबा
सावळी येथील सराफा दुकान सायंकाळ चे सुमारास बंद करुन नेहमी प्रमाणे चारचाकी वाहनाने आर्णीकडे आपल्या मुलासह येत असतांना अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनाने पाठलाग करुन फिर्यादीचे वाहनास ओव्हरटेक करुन व वाहन आडवे लावले तसेच फिर्यादीचे वाहनाच्या काचा फोडुन त्यांचे अंगावर मिरची पावडर फेकुन फिर्यादी जवळ असलेली सोन्याचे दागीने व नगद रक्कम असलेली बॅग पिस्टलचा धाक दाखवून जबरीने चोरुन नेली होती सदर प्रकरणी दिनांक ०५/०३/२०२४ रोजी फिर्यादी विशाल देवीदास लोळणे यांनी पोलिस ठाणे आर्णी येथे दिलेल्या तक्रारी
वरुन चार अज्ञात आरोपीविरुध्द अपराध क्रमांक २०५/२०२४ कलम ३९४.३४ भादवि सह ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरच्या गुन्हयात आरोपींनी  विना क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार वापरली असल्याची माहिती वगळता इतर कोणताही माहिती
गुन्हा उघडकीस आणने करीता उपलब्ध नव्हती त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येण्यास अडचनी येत असल्याने पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा तसेच प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते त्यावरुन स्वा.गु.शा. कडील पथकाने घटनास्थळ निरीक्षण व फिर्यादी यांना विचारपुस करुन गुन्हयात वापरलेले वाहन हे पांढन्या रंगाचे, व मागील चाकाला डिस्क नसलेले आहे अशी माहिती प्राप्त करुन महागांव, गुंज, पुसद, बिटरगांव उमरखेड व आजुबाजुचे परिसरात पथके रवाना करुन माहिती प्रमाणे वाहनाचा शोध सुरु केला असता कुठेच काही पत्ता लागत नसतांना व चोरी करुन पळतांना लहान रस्त्यांचा आधार घेत गेल्याने सदरचे वाहन हे कुठेच सिसिटिव्ही मधे निर्दशनात आले नाही म्हनुन पोलिसांनी तपासाची दिशा बदलवून उलट दिशेने तपास सुरु केला असता सदर गुन्ह्यातील कार ही एका पेट्रोलपंपावर डिझेल भरतांनी निर्दशनात आली तसेच तिथे त्यांनी ॲानलाईन पेमेंट केल्याने सदरबाबत गोपनीयता बाळगुन ॲानलाईन पेमेंट करणाऱ्या ईसमाबाबत संबंधीत बॅंकेकडुन माहीती काढुन त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यास उमरखेड येथील नाग चौकातुन गुन्ह्यातील वाहनासह

१) शेख अफसर शेख शारीक वय ३४ वर्षे रा. शहा कॉलणी उमरखेड

यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल व कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन त्याचे इतर साथीदार

२) फैय्याज खान बिसमिल्ला खान वय २८ रा. राम रहीम नगर, उमरखेड,

३) शेख निसार शेख उस्मान वय ३२ रा. ताजपुरा उमरखेड,

४) शेख जमीर शेख फैमोदीन वय २४ रा. ताजपुरा उमरखेड,

५) शाकीब खॉ अय्युब खाँ वर्ष २८ रा. रहा कॉलणी नांदेड रोड उमरखेड

यांनी सदरची घटना केली असल्याची कबुली दिली. त्यावरुन उपरोक्त आरोपी क्र. ०२ ते ०४ यांना ताब्यात घेतले परंतु आरोपी क्र. ०५ हा मिळुन आला नव्हता. त्यानंतर सहा. पोलिस अधीक्षक तथा
उपविभागीय पोलीस अधिकारी  चिलमुला रजनीकांत यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकासह यातील आरोपी क्र. ०१ ते ०४ यांचेकडे गुन्हयासंबधाने तपास नमुद आरोपीतांकडुन गुन्हयात चोरी गेलेले दागीने ज्यात मंगल पदक, सोन्याची पथडी, ओम लॉकेट, सेवन पीस, सोन्याची पुंगळी, बाळी, टॉप्स, फॅन्सी टॉप्स, खड्यांचे टॉप्स, मणी, अंगठया, वाटी डोरले, असे एकुण ३८९.७०० ग्राम सोन्याचे दागीने व नगदी ४७,७०० रु तसेच ०४ मोबाईल व आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण २५,९२,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा अवघ्या दोन दिवसाचे आत उघडकीस आणला आहे. गुन्हयाचे तपासात घटनेचा मुख्य सुत्रधार आरोपी शेख निसार शेख उस्माण हा असल्याची
बाब उघड झाल्याने नमुद आरोपीतांकडुन गुन्हयात चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल यांना पुढीस तपासकामी पोलिस स्टेशन,आर्णी यांचे ताब्यात देण्यात आले
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोिस अधीक्षक, पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा चिलुमुला रजनिकांत, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ  आधारसिंग सोनोने, सपोनि गणेश बनारे, सपोनि गजानन गजभारे, पोउपनि धनराज हाके, चालक पोउपनि रेवन जागृत पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल बेग, किशोर झेंडेकर, अमीत झेंडेकर, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, ताज महंमद, सुधीर पिदुरकर, सुनिल खंडागळे, चालक अमीत कुमरे, योगेश टेकाम सर्व स्वा.गु.शा. यवतमाळ तसेच सपोनि अमोल पूरी व त्याचे पथक सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.