Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(शैलेश चौधरी)
एरंडोल: एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे दि. २० सप्टेंबर २०२१ सोमवार पासून एरंडोल येथील शेतकी संघाच्या मुख्य कार्यालयात खरीप हंगाम २०२१/२०२२ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य ज्वारी,मका बाजरी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू राहील असे कळविण्यात आले आहे.
फॉर्म स्विकारण्याची शेवटची ता. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत आहे तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सातबारा उतारा पिक-पेरा,खरीप हंगाम चालू वर्षाचा लावलेला,सत्यप्रत बँक पासबुक प्रिंटेड झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणावे. असे आवाहन तालुका शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील यांनी केले आहे.प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्या कुटुंबातील (आई,वडील,मुलगा मुलगी,पती-पत्नी) सातबारा उतारा ओळख पडल्यानंतरच स्वीकारण्यात येईल.असे शेतकी संघाचे अध्यक्ष नीळकंठ पाटील व व्यवस्थापक अरुण पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.