Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गौणखनिज(वाळुची)विनापरवाना वाहतुक करणाऱ्यावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाच्या छापा,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…..
देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध गौणखनिज चोरी बाबत कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते
त्याअनुषंगाने सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांनी दिनांक 11.03.2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की देवळी पोलिस स्टेशन हद्दीत शासनाचा महसुल बुडवुन वाळुची चोरटी वाहतुक होनार आहे यामाहीतीवरुन उपविभागिय अधिकारी कार्यालय,पुलगाव येथील पथक व पोलिस स्टेशन देवळी येथील पथकाने मौजा अंदोरी रोड ते अडेगांव फाटा येथे नाकेबंदी करीत असतांना अवैध वाळुची वाहतुक करणारे टिप्पर मिळुन आले.
घटनास्थळी ट्रक व टिप्पर चालकांना रॉयल्टी व परवाना तसेच वाहनाचे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे मिळुन आलेले नाही व सदरची वाळु ही साती घाट वर्धा नदीचे घाटातुन चोरी करून आणल्याचे सांगितले. करीता एकुण 14 आरोपी 1) पुरूषोत्तम लक्षमण गोहाणे रा. हल्बीपुरा, कळंब जि. यवतमाळ 2) सयद लुकमान सयद रहमान रा.कुरेशीपुरा कळंब जि. यवतमाळ 3) निलेश तिजारे रा. देवळी, 4) परसराम भास्करराव कन्नाके रा.पडेगाव रोड सालोड, 5) नितीन सुभाषराव जयस्वाल रा.गोरक्षण वार्ड, देवळी 5)धिरज बाबाराव ओरकर रा. शास्त्री चौक वर्धा 6 ) निलेश तिजारे जि.वर्धा (पसार)7) महेशविष्णु शेंडे रा. वंजारी फैल यवतमाळ 8 ) अंकुश चंद्रकांत ढगे रा. वेणी कोठा बाभुळगाव 9)किशोर शिवराम चांदेकर रा. वंजारी फैल यवतमाळ 10 ) गणेश वामनराव नेवारे रा. वंजारी फैल यवतमाळ 11 ) सचिन महल्ले रा. यवतमाळ, 12 ) सुनिल गोविंदराव तेलरांधे रा. वार्ड नं. 17सदेवळी 13) निलेश राजेंद्र येंगळे रा वार्ड नं. 17 देवळी 14 ) निलेश तिजारे जि.वर्धा (पसार)
यांचे ताब्यातुन एकुण 6 टिप्पर, अंदाजे कि. 78,00,000/- रु. 20 ब्रास वाळु, कि. 1,20,000/- रु. टाटा इंडीगो कार, एक स्कार्पिओ, कि. 13,00,000/- रु. वेगवेगळया कंपनीचे एकुण 9 मोबाइल कि. 1,07,000 /- रु. असा एकुण 93,27,000/- रु. चा माल जप्त
करण्यात आलेला आहे. त्यांचे विरुध्द कलम 379, 109, 34 भादवि सहकलम 3(1),130,177,181मोवाका. अन्वये पो. स्टे. देवळी येथे एकुण 3 गुन्हे नोंद करण्यात आले आहे. तिन्ही गुन्हयातील एकुण 10 आरोपींना अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक, सागर कवडे यांचे मार्गदशनाखाली सहा.पोलिस अधीक्षक (भापोसे) राहुल चव्हाण,उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगांव यांनी प्रत्यक्ष हजर राहुन केलेली असुन सदर करवाई दरम्यान ठाणेदार पो. स्टे. देवळी मनोज, पोउपनि अश्विन गजभिये, सफौ. शालिक वाघमारे, पोहवा. ब्रम्हानंद मुन, रविंद्र डहाके, पोशि शुभम कावळे, प्रणय इंगोले, तुषार ढोक,गणेश इंगळे हे हजर होते. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि अश्विन गजभिये पो.
स्टे. देवळी हे करीत आहेत.