Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लेडीज बारच्या मॅनेजरला धमकाविणाऱ्या तोतया पोली

8

पनवेल,दि.२९ :- जुन्या पनवेल महामार्गावरील पळस्पेफाटा येथील लेडीज बारच्या मॅनेजरला धमकाविणाऱ्या बोगस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलिसाला पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. या ३१ वर्षीय बोगस पोलिसाचे नाव सलमान मुलाणी असून तो मूळचा पुणे चाकण येथील राहणार आहे.

सलमान याची मैत्रिण याच ऑर्केस्ट्रा बार मध्ये सिंगर म्हणून या बारमध्ये काम करते. तीला व्यवस्थापकांनी कामावरुन काढून टाकल्याने त्याने मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी हा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सलमान याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी रात्री आठ वाजता पळस्पे फाटा येथील गोल्ड डिगर या लेडीज ऑक्रेस्ट्रा बारमध्ये सलमान हा पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात ऑर्केस्ट्राबारच्या मॅनेजर यांच्याकडे आला. सलमानने मॅनेजरला धमकावले. सलमानच्या मैत्रिणीला कामावरुन का काढले याचा जाब विचारताना सलमान याने सूरेशला शिविगाळ करुन मॅनेजरच्या कानाखाली मारली. सलमानने मॅनेजरला मारताना त्याच्या मैत्रिणीला लगेच कामावर परत घेऊन तीच्या पगाराचा हिशेब देण्याचा तगादा लावला.व त्या मैत्रिणीचे पगाराचे पैसे दिले नाही, तर व्यवस्थापकाला हॉटेल बंद करुन टाकण्याची धमकीदेखील दिल्याचे व्यवस्थापकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस गणवेशात असलेल्या
सलमानच्या खांद्यावरील दोन तारका पाहून प्रथमदर्शी सलमान सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचा समज पोलिसांना झाला. त्याच्या गणवेशावर महाराष्ट्र पोलीस असल्याचा बॅच होता. त्याच्या बॅचच्या शेजारी लाल व निळ्या रंगाची रिबिन, डाव्या हाताच्या दंडावर महाराष्ट्र पोलीसचा लोगो, कमरेला लाल रंगाचा बेल्ट, पायात लाल रंगाचे बूट असा पेहराव पाहून काही क्षण चौकशीसाठी आलेल्या पोलिसांनी सुरुवातीला शांतपणे चौकशी सुरु केली. अखेर या स्थानिक पोलिसांनी सलमानला पनवेल शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी सलमानला कुठल्या पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. त्याची पदश्रेणी कोणती, तो कोणत्या साली म्हणजे कोणत्या बॅचचा पोलीस झाला याची माहिती विचारल्यावर सलमानचा गोंधळ उडाला. सलमानने तो २९४ हा बॅच सांगितल्यामुळे पोलीस अधिकारी लभडे यांना तो पोलीस नसल्याची खात्री पटली. आतापर्यंत राज्यातील १२० पर्यंत बॅच झाल्यामुळे सलमान खोटी उत्तरे पोलिसांना देत होता. काही मिनिटांत खऱ्या पोलिसांनी खोट्या बोगस सलमानचा पर्दाफाश केला. सलमान हा पूणे चाकण येथील माणिक चौकातील यशोदिप कॉम्पलेक्समधील चिकन विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी याप्रकरणी भादवी. १७० प्रमाणे ३२५, ५०४ अन्वये सलमान मुलाणी याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.