Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चकमकी बाबत हाती आलेल्या माहितीनुसार, यात नक्षलवाद्यांचा कमांडर शंकर राव हा देखील ठार झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीच्या ठिकाणाहून १८ मृतदेह सापडले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधुनिक रायफल, सात AK ४७ रायफल, ३ LMG जप्त करण्यात आले आहेत. चकमकीत ठार झालेला शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षिस होते.
बीएसएफ आणि जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याच्या वृत्ताला बीएसएफकडून दुजोरा मिळाला आहे. कांकेर येथे २६ एप्रिल रोजी म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. कांकेर लोकसभा मतदारसंघात ८ विधानसभा मतदार संघ येतात. यातील सहा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. बस्तर जिल्ह्याचा एक भाग असलेल्या कांकेरला १९९८ साली वेगळं करत स्वतंत्र जिल्हा करण्यात आले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सरासरी ४५ जवान शहीद होतात. गेल्या काही महिन्यात नक्षलवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीय. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे.