Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेसची भीती नाही, भाजपच्या विरोधात प्रादेशिक पक्षांचे आव्हान; काय सांगतात २००९ ते २०१९ पर्यंतचे आकडे

11

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तेव्हा देशभरात एकच लाट उसळली होती. भाजपला बहुमताचा जादूई आकडा २७२ हून अधिक १० अशा २८२ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सलग दोन वेळा १० वर्षे केंद्रावर सत्ता गाजवणाऱ्या यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात घोटाळ्यांमुळे देशातील लोकांमध्ये निराशेचं वातावरण होतं. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी झाली.

काँग्रेस पक्ष केवळ ४४ जागा जिंकून दुहेरी अंकावर आला. २०१९च्या पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांच्या खासदारांची संख्या दुहेरी आकड्यांमध्येच राहिली. दरम्यान, या काळात भाजप पक्ष वाढत गेला आणि प्रादेशिक पक्षही वाढत गेले. आकडे पाहिले तर समजतं, की काँग्रेस पक्षाला भाजपच नव्हे तर प्रादेशिक पक्षही कसे मागे पाडत आहेत.
एसटीवर शिंदे-फडणवीस-दादांचा फोटो, प्रकाश आंबेडकरांनी फोटो क्लिक केला, ट्विट करुन रोखठोक सवाल

भाजप विरुद्ध काँग्रेस

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये १७३ जागांवर थेट लढत झाली होती. या जागांवर भाजप किंवा काँग्रेस एकतर जिंकले होते किंवा दुसऱ्या स्थानावर होते. यापैकी ५४ टक्के जागा काँग्रेसने जिंकल्या तर उर्वरित ४६ टक्के जागा भाजपने जिंकल्या. पण २०१४ मध्ये परिस्थिती उलट झाली.

भाजपने थेट लढलेल्या ८८ टक्के जागा जिंकल्या. १८९ थेट जागांपैकी १६६ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ २३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. २०१९ मध्ये हे अंतर मोठं झालं, जेव्हा भाजपने थेट लढलेल्या १९० जागांपैकी ९२ टक्के जागा जिंकल्या.
चीनच्या भीतीने काँग्रेसने अरुणाचल प्रदेशात आपला उमेदवार उभा केला नाही? सोशल मीडियावरील दाव्याचं सत्य काय?
मतांबद्दल बोलायचं झालं, भाजपच्या मतांची टक्केवारी २००९ मध्ये ४१ टक्क्यांवरुन वाढून २०१४ मध्ये ५०.९ टक्के आणि २०१९ मध्ये ५६.५ टक्के झाली. तर, २००९ आणि २०१४ या काळात काँग्रेसची मतसंख्या कमी झाली. २०१९ मध्ये त्यात काहीशी सुधारणा झाली. मात्र, मतांमध्ये झालेल्या वाढीचा फारसा फायदा झाला नाही.

loksabha

सोलापूरला २०१४ आणि २०१९ चे प्रयोग फसले, आता भाजप नवा चेहरा उतरवणार?

भाजप विरुद्ध बिगर काँग्रेस : दुहेरी लढत

२००९ मध्ये ५३ जागा अशा होत्या, जिथे थेट लढत भाजप आणि काँग्रेसशिवाय इतर पक्षामध्ये होती. भाजपने इथे प्रत्येक तीन पैकी जवळपास २ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांचा स्ट्राइक रेट सुधारला आणि गैर-काँग्रेस पक्षांविरुद्ध ७९ टक्के जागा जिंकल्या. पण २०१९ मध्ये भाजप यापैकी बहुतांश प्रादेशिक पक्षांच्या मागे पडला. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, भाजपने स्थिर वाढ नोंदवली आहे तर बिगर-काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये २०१४ मध्ये घट नोंदवली गेली. पण २०१९ मध्ये त्यांना मोठा फायदा झाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.