Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एक किलोचा फोन झाला लाँच; २००मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह २३८००एमएएचची राक्षसी बॅटरी

18

UNIHERTZ नं रगेड कॅटेगरीमध्ये एक टिकाऊ स्‍मार्टफोन लाँच केला आहे. याचे नाव आहे 8849 Tank 3 Pro. हा फक्त स्मार्टफोन नसून याचा वापर प्रोजेक्‍टर म्हणून देखील करता येईल. यात पावरफुल बॅटरीचा देखील वापर करण्यात आला आहे. तसेच हा ५जी नेटवर्कला देखील सपोर्ट करतो. हा मिड प्रीमियम रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात मीडियाटेकचा डाइमेंसिटी ८२०० अल्‍ट्रा प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये १८ जीबी पर्यंत रॅम आहे.

UNIHERTZ 8849 Tank 3 Pro ची किंमत

UNIHERTZ 8849 Tank 3 Pro जागतिक बाजारात ६४० डॉलर (जवळपास ५२,९३९ रुपये) मध्ये लाँच झाला आहे. कंपनी ५० डॉलरचं कुपन देखील देत आहे, त्यामुळे किंमत आणखी कमी होते. फोनची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. तसेच शिपिंग कॉस्‍टमुळे काही मार्केट्समध्ये याची किंमत कमी जास्त असू शकते.

UNIHERTZ 8849 Tank 3 Pro चे फीचर्स

UNIHERTZ 8849 Tank 3 Pro स्‍मार्टफोनमध्ये ६.७९ इंचाचा डिस्‍प्‍ले आहे. हा १०८० x २४६० पिक्‍सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यातील स्क्रीन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह बाजारात आली आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्‍सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी ‘मीडियाटेकचा डायमेन्सिटी ८२०० अल्‍ट्रा’ वापरण्यात आला आहे, जो ५जी नेटवर्क सोबतच वाय-फाय ६ ला सपोर्ट करतो.

UNIHERTZ 8849 Tank 3 Pro मध्ये २३८०० एमएएचची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही चार्ज करण्यासाठी १२० वॉटचा चार्जर मिळतो. फोनमध्ये १६ आणि १८ जीबी रॅम असलेले दोन व्हेरिएंट आहेत आणि याची इंटरनल स्‍टोरेज ५१२ जीबी आहे. ही स्‍टोरेज एसडी कार्डच्या माध्यमातून २ टीबी पर्यंत वाढवता येते.

या स्‍मार्टफोनमध्ये १०० लुमेन मॅक्सिमम ब्राइटनेस असलेला एक DLP प्रोजेक्टर देखील आहे. हा छोट्या एरियामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. परंतु या फोनचे वजन सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. युनिहर्ट्झचा ८८४९ टॅंक ३ प्रोचे वजन ९६९ ग्राम म्हणजे सुमारे १ किलो आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.