Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यानाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांपासून पृथ्वीवर डेटा पाठवणे बंद केले होते. या यानाशी संपर्क होत असला तरी माहिती मिळवणे मात्र शक्य होत नव्हते. हा शोध नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीकडे (नासा जेपीएल) सोपवण्यात आला होता. या मिशनमध्ये अडथळा निर्माण करणारी चिप संस्थेला मिळाली त्यानंतर ही अडचण आल्याचे समजले होते.
NASAने काढला तोडगा
नासाच्या शास्त्रज्ञांनी एक कोड विकसित केला ज्यामुळे व्हॉयेजर 1 मधील तांत्रिक दोष दूर झाला. आता शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की व्होएजर 1 पुन्हा त्याची इंजिनिअरिंग सिस्टिम आणि त्याच्या स्थितीबद्दल माहिती पृथ्वीवर उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांना शेअर करत आहे.
नासा व्हॉयेजरच्या X-हँडलवरून शास्त्रज्ञांनी ही बातमी शेअर केली. त्यांनी लिहिले- “हाय, मी आहे. – V1”. हे यान अंतराळातील सर्व डेटा शास्रज्ञांशी शेअर करेल हे यामुळे नक्की झाले आहे. व्होएजर अंतराळयान 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. ते ते पृथ्वीपासून १५ अब्ज किलोमीटर दूर आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवरून व्हॉयेजर 1 वर संदेश पाठवला जातो तेव्हा अंतराळ यानापर्यंत पोहोचण्यासाठी 22.5 तास लागतात.
व्हॉयेजर 1 चे यश पाहून शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये व्हॉयेजर 2 लाँच केले. दोन्ही अवकाशयानांनी सोबत ‘गोल्डन रेकॉर्ड्स’ नेले आहेत. ही 12-इंच सोन्याचा मुलामा असलेली तांब्याची डिस्क आहे, ज्याचा उद्देश आपल्या जगाची म्हणजे पृथ्वीविषयीची माहिती भविष्यातील अज्ञात लोकांपर्यंत पोचवणे हा आहे. व्हॉयेजर 1 आणि 2 अंतराळयानाचा उद्देश गुरू आणि शनि ग्रहांचा अभ्यास करणे हा आहे. भविष्यात, ते बाह्य सौर यंत्रणेच्या शोधासाठी देखील वापरले जाऊ शकते.