Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai News: मुंबादेवी विधानसभेचे माजी आमदार म्हणतात ‘मै जिंदा हुं ये पार्टी को बताना था’

6

BJP Atul Shah News: भाजप पक्षाचे माजी आमदार अतुल शाह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगत पक्षाला धक्का दिला होता. त्यांनी नामांकन अर्ज भरण्याचा विचार सोडला आणि पक्षाचंच काम करणार असल्याचं सांगितलं.

Lipi

पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई: महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत प्रत्येक पक्षाकरिता आव्हान निर्माण केलेलं पहायला मिळत आहे. मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून महायुतीमार्फत शायना एन सी यांना शेवटच्या क्षणी उमेदवारीची लॉटरी लागली. त्यानंतर लागलीच त्यांनी नामांकन अर्ज दाखल पण करून घेतलेला आहे.

मात्र, याही मतदारसंघात बंडखोरीचे चित्र पाहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मुंबादेवी मतदार संघातील भाजप पक्षाचे माजी आमदार अतुल शाह यांना पक्ष विधानसभा निवडणुकीत आपला विचार करेल असं वाटत होतं. मात्र, महायुतीमार्फत शायना एन सी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे याही मतदारसंघात बंडखोरी होईल असं चित्र निर्माण झालेलं होतं.
Shaina NC:अरविंद सावंत मला ‘माल’ म्हणाले, ऑडिओ क्लिप ऐकवत शायना एनसींचे गंभीर आरोप, ठाकरे-पवारांनाही घेरलं
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले अतुल शाह यांनी मुंबादेवी विधानसभेचे एकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे. करोना काळात अतुल शाह यांचं उल्लेखनीय कार्य केलेले पाहायला मिळालेलं होतं. माजी नगरसेवक सुद्धा असलेले अतुल शाह यांना तिकीट न दिल्याने २९ ऑक्टोबरला ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार सोडत पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केलं.

‘मै जिंदा हुं ये पार्टी को बताना था’ असं ते यावेळी म्हणाले. मी गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतोय. तिकीट दुसऱ्याला दिलं जातं तेव्हा पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले केलं जातं आणि ते दुखावणारे असते, अशी प्रतिक्रिया पण अतुल शाह यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलतांना दिली.

Mumbai News: मुंबादेवी विधानसभेचे माजी आमदार म्हणतात ‘मै जिंदा हुं ये पार्टी को बताना था’

मुंबादेवी विधानसभा मतदार संघात महायुतीमार्फत शायना एन सी तर महाविकास आघाडी मार्फत विद्यमान आमदार अमिन पटेल यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. कॉस्मोपॉलिटन भाग असलेल्या या मतदारसंघात मतदार नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करतात हे आगामी काही दिवसातच समजेल. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात परत एकदा कडवी झुंज पाहायला मिळणार आहे यात शंकाच नाही.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.