Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
- राज्यातील एका जिल्ह्याने घेतला जमावबंदीचा निर्णय
- २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत राहणार जमावबंदी
जिल्ह्यात ४ ऑक्टोबरपर्यंत मस्कऱ्या गणेशोत्सव सुरू असून घटस्थापना दिनांक ७ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणूक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जमावबंदी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने विविध कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत काही गोष्टींना मनाई केलेली आहे.
जमावबंदी काळात नेमक्या कोणत्या गोष्टींना असणार मनाई?
शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, ज्यामुळे सभ्यता अथवा नितीमत्ता यांना धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे, अशा गोष्टींना मनाई असणार आहे.
दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर निर्बंध काळात जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असं प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.