Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकाच वेळी ५ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या नेत्याने; सध्याची मर्यादा किती? पोटनिवडणुकीवर किती खर्च होतो?

12

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एकच उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. गेल्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळी त्यांनी अमेठी आणि वायनाडमधून तर यावेळी वायडना आणि रायबरेलीतून अर्ज केला आहे.

फक्त राहुल गांधीच नाही तर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील विधानसभेच्या दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ओडिसामध्ये लोकसभे सोबत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पटनायक यांनी हिंजली आणि कांटाबाजी येथून अर्ज दाखल केलाय.

गेल्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीत संपूर्ण देशातून २३ उमेदवारांनी दोन मतदारसंघातून अर्ज केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली वाराणसी आणि वडोदरा येथून निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. नंतर वडोदरा जागा सोडली होती.

एक व्यक्ती जर एकाच मतदारसंघाचे संसदेत किंवा विधानसभेत प्रतिनिधित्व करत असेल तर दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज कसा काय भरू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. १९९६ पर्यंत एक व्यक्ती हव्या तितक्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत होता. तोपर्यंत फक्त हा नियम होता की एक व्यक्ती एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. १९९६ साली लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ३३ मध्ये बदल करण्यात आले आणि एका व्यक्तीला जास्ती जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल असा नियम केला. त्याच बरोबर दोन्ही जागांवर विजय मिळवला तर एका जागेचा राजीनामा देण्याचा नियम करण्यात आला.

या संदर्भात २००४ साली निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधि कायद्यात बदल करण्याची शिफारस केली होती. आयोगाच्या मते दोन जागांवरून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचा दोन्ही ठिकाणी विजय झाला तर एका जागेचा राजीनामा दिल्यानंतर संबंधित ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा खर्च संबंधित विजयी उमेदवाराकडून घेतला जावा.
कसाबची बाजू घेणाऱ्या काँग्रेसला राज्यातून हद्दपार करा, पंतप्रधान मोदींचा नगरमध्ये घाणाघात

आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा कलम ३३(७)मध्ये बदल करून दोन ठिकाणाहून विजय होणाऱ्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल करण्याची शिफारस केली होती. आयोगाने विधानसभेसाठी ५ लाख तर लोकसभेसाठी १० राख रुपये इतका खर्च संबंधित राजीनामा देणाऱ्या उमेदवाराकडून घेण्याची शिफारस केली होती.

निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर २०१५ साली कायदा आयोगाने सहमती दर्शवली होती. कायदा आयोगाच्या २५५व्या अहवालात एका व्यक्तीला एका ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी असे म्हटले होते.

किती खर्च होतो?

जेव्हा एखादा उमेदवार दोन मतदारसंघातून विजयी होतो तेव्हा त्याला एका जागेवरून राजीनामा द्यावा लागतो. आणि नियमानुसार रिक्त झालेल्या जागेवर ६ महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते. जेव्हा एका मतदारसंघात पोटनिवडणू्क होते तेव्हा पुन्हा खर्च करावा लागतो. २०१९ साली आयोगाने ५ हजार कोटी खर्च केला होता. म्हणजे सरासरी ९.२० कोटी इतका खर्च होय.

दोन पेक्षा अधिक जागा लढवणारे नेते

एकाच वेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सोनिया गांधी, मायावती, देवीलाल, बीजू पटनायक, इंदिरा गांधी यांचा समावेश होतो. १९८९ साली माजी उपपंतप्रधान देवीलाल यांनी ३ वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मायावती यांनी १९९१ साली ३ मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिनही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. १९७१ साली बीजू पटनायक यांनी ४ विधानसभा आणि एक लोकसभेच्या मतदारसंघातून निवडणू्क लढवली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.