Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वृत्तसंस्था, तिरुअनंतपुरम : केरळच्या त्रिचूर, मल्लपुरम आणि कोळिकोड या जिल्ह्यांमध्ये ‘वेस्ट नाइल’ तापाचे रुग्ण आढळल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. या जिल्ह्यांतील प्रशासनाला दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. नागरिकांनी या तापामुळे भयभीत होऊ नये; परंतु या तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
डासांच्या क्युलेक्स या प्रजातीपासून फैलावणाऱ्या या तापाचे रुग्ण केरळच्या काही भागांत आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, विस्मरण होणे, उलटी होणे, अंगाला खाज सुटणे, शिथिलता येणे ही या तापाची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, केरळमधील अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळलेली नाहीत, असे सरकारने म्हटले आहे.
या तापाच्या एक टक्के रुग्णांना मेंदूसंबंधी समस्या उद्भवतात व त्यांचा मृत्यू होऊ शकतो, याकडेही सरकारने लक्ष वेधले आहे. या तापावर अद्याप एकही औषध अथवा लस उपलब्ध नसल्याने या तापाची लक्षणे जाणवल्यास रुग्णांनी वेळीच उपचार करून घ्यावा, असे आवाहन केरळ सरकारने केले आहे.