Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….

12

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

घातपात करण्याचे उद्देशाने जमिनीत पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलिसांनी केल्या नष्ट,मोठा अनर्थ टळला, १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बि.डी.डी.स. पंथकाच्या साहाय्याने करण्यात आले नष्ट….

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात नक्षलवादी नेहमी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर नक्षलवाद्यांकडुन विविध सप्ताहात, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो.

गडचिरोली पोलिस दलाने अश्याच प्रकारच्या नक्षलवादयांचा
घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोस्टे गॅरापत्ती हद्दीमध्ये असलेल्या टिपागड पहाडी जंगल परिसरामध्ये नक्षलवाद्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ दरम्यान आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स तसेच पोलिस
पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे. अशी गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोणत्याही संभाव्य धोका टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी त्या भागात शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलाचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स / स्फोटकांचा वापर करणे
अशक्य होते. करिता खात्रीशीर मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर टिपागड पहाडी जंगल परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकिस आल्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी तातडीने ०२ बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी- ६० चे एक पथक आणि सी. आर. पी. एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले.

त्यानुसार दि.(६)/ रोजी सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ०६ प्रेशर कुकर व स्फोटकांनी आणि गंजलेल्या लोखंडी तुकड्यांनी भरलेले ०३ क्लेमोर पाईप्स देखील सापडले.उर्वरित ३ क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लॅकेट देखील सापडले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १२ किलो स्फोटकांनी भरलेले
एकुण ९ आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी. डी. डी. एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. यासोबतच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जाळून नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई ही  पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (अभियान)यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी, एम. रमेश पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, बीडीडीएस पथक व सिआरपीएफच्या क्युएटी पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली

Leave A Reply

Your email address will not be published.