Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतीय रेल्वेनेचे नियम
- ट्रेनमध्ये फक्त कुत्रे, मांजर आणि पक्ष्यांना पाळीव प्राणी म्हणून परवानगी आहे.
- पाळीव प्राण्यांना फक्त एसी, फर्स्ट क्लास आणि फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करण्याची परवानगी आहे.
- यानंतर तुम्हाला स्टेशनच्या चीफ रिझर्व्हेशन ऑफिसरकडे अर्ज लिहावा लागतो, ज्यात तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याबद्दल माहिती देता. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने लिहिता येतो.
- ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी तुमच्या पाळीव प्राण्यांला लस ही घ्यावी लागणार आहे. याशिवाय त्यांना प्रवास करता येणार नाही.
- ट्रेनमध्ये प्रवास करताना एका प्रवाशाच्या (पीएनआर) वर एकच पेट प्रवास करू शकतो पण त्यासाठी त्यांचे वेगळे तिकीट काढावे लागेल.
- पाळीव प्राण्यांच्या मालकाला प्रवासाच्या सुमारे दोन तास आधी स्थानकावर पोहोचावे लागते जेणेकरून ते लस प्रमाणपत्र, कन्फर्म तिकीट, इत्यादी आवश्यक कागदपत्रे वेळेपूर्वी स्टेशन ऑफिसरला दाखवू शकतील.
- या प्रवासात आपल्या पाळीव प्राण्याची सगळी जबाबदारी मालकाला घ्यावी लागते.
- भारतीय रेल्वे पेट्सवर स्वतंत्र शुल्क आकारते. प्राण्यांच्या वजनानुसार तुम्हाला रक्कम भरावी लागते.
एअर इंडियाचे नियम
- इथे जर आपल्याला आपल्या पेट्ससोबत प्रवास करायचा असेल तर आधी फ्लाइटच्या कमांडरची परवानगी घ्यावी लागेल.
- याशिवाय तुम्हाला प्रवास करता येणार नाही.
- तर रेल्वेप्रमाणे इथे ही प्राण्याचे पूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे तसेच सहप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कंटेनरमध्ये ठेवणे गरजेचे आहे.
- त्यांचे वजन ५ किलोपेक्षा जास्त नसावे.