Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
भद्रकाली पोलिस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केला पर्दाफाश ,भद्रकाली गुन्हे शोध पथकाची कामगिरी….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भद्रकाली पोलिस स्टेशन हहद्दीत दि.(१६) चे मध्यरात्री दरम्यान वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ०९ मोटर सायकल, एक ट्रक, एक टेम्पो, यांना आग लावुन जाळपोळ केली होती.तसेच जहांगीर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकुन घर जाळण्याचा प्रयत्न केल्याने त्याबाबत भद्रकाली पोलिस ठाणे येथे गु.र.नं. १७४/२०२४ भादंवि क. ४३६, ४३५, ३०८ अन्वये गुन्हा दाखल केला होता
सदरचा गुन्हा हा भद्रकाली पोलीस ठाणे हददीत असलेली कायदा व सुव्यव्यस्था बिघडवण्यासाठी केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याने अशा संवेदनशील गुन्हयातील अज्ञात आरोपींची तात्काळ
माहीती घेवुनव त्यांचा शोध घेवुन अटक करणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त परीमंडळ १ किरणकुमार चव्हाण,सहा पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व पोलिस
निरीक्षक (गुन्हे) संतोष नरुटे, पोलिस निरीक्षक (प्रशासन) विक्रम मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व त्यांचे सोबत असलेले पोलिस पथकाने वरील नमुद
संवेदनशिल गुन्हयातील अज्ञात व संशईत आरोपींचा कोणताही सुगावा नसतांना गुन्हा घडल्यापासुन अतिशय कौशल्यपुर्ण पध्दतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्हयात आरोपी १) सनी संजय गावडे, वय २८ वर्षे रा. पिपंळे गल्ली, म्हसरूळ, नाशिक २) प्रशांत बाळासाहेब फड, वय ३१ वर्षे रा. विदयानगर, मखलाबाद, म्हसरूळ, नाशिक ३) प्रविण बाळु
कराटे, वय २४ वर्षे रा. विदयानगर, मखलाबाद, म्हसरूळ, नाशिक ४) आकाश राजु सांळुके, वय २४ वर्षे रा.दत्त चौक, सिडको नाशिक ५) विजय सुरेश लोखंडे, वय २८ वर्षे रा. आडगांव नाशिक यातील आरोपी क्र १ ते ३ यांना शनिशिंगनापुर येथुन सापळा लावुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी क. ४ व ५ यांना नाशिक शहरातुन रात्रीचे अंधारातुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा दहशत करण्याचे हेतुने केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असुन त्यांना सदर गुन्हयात अटक करून
यामध्ये त्यांचे अजुन कोणी साथीदार आहेत किंवा कसे? याबाबत वरीष्ठांचे मागदर्शानाने गुन्हयाचा सविस्तर तपास विक्रम मोहीते, पोलिस निरीक्षक (प्रशासन) हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परीमंडळ १, किरणकुमार चव्हाण,सहा पोलिस सरकारवाडा विभाग डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि गजेन्द्र पाटील,पोलिस निरीक्षक(गुन्हे) संतोष नरुटे भद्रकाली पोलिस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार,सपोउनि यशवंत गांगुर्डे, पोहवा नंरेद्र जाधव,सतिष सांळुके, संदीप शेळके, नापोशि कय्युम सैय्यद, लक्ष्मण ठेवणे,अविनाश जुंद्रे, पोना / १७९२
महेश बारेसे, पोशि/ २३७ नितीन भामरे, पोशि/ १४६ नारायण गवळी, पोशि/१५७७ सागर निकुंभ,
पोशि/ २७२७ धनंजय हासे, पोशि/१९८६ निलेश विखे, पोशि/ २११३ योगेश माळी, पोशि/ २७२२ दयानंद
सोनवणे, पोशि/ २७४७ जावेद शेख यांनी पार पाडली आहे.