Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ऑनलाईन टास्क देऊन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

ऑनलाईन टास्क देऊन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – फिर्यादीला ऑनलाईन टास्क देऊन फसवणूक करणाऱ्या आणि विविध सायबर फ्रॉडसाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामधील लोकांची अकाऊंट विविध बँकांमध्ये उघडुन सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या टोळीस सायबर सेल पिंपरी चिंचवड यांनी अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.२९३/२०२४ भादंवि कलम ४०६,४१९,४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६-डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी कर्नाटक बैंक चे पिंपरी शाखेचे ब्रांच मॅनेजर यांनी देखील त्याचे बँकेमध्ये ३४ पेक्षा अधिक खाती दोन महिन्यामध्ये उघडण्यात आली असुन त्यामध्ये संशयास्पद व्यवहार होत असुन त्याबाबत सायबर तक्रारी प्राप्त होत असल्याचे कळविले होते.

या बाबत अधिक माहिती अशी की, मुकाई चौक, रावेत येथिल फिर्यादी यांना फेब्रवारी महिन्यामध्ये व्हॉटसॲपवर ऑनलाईन पार्टटाईम जॉबसाठी लिंक आली होती. सदरची लिंक फिर्यादी यांनी क्लिक केल्यानंतर फिर्यादी हे आपोआप टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम ग्रुपला ॲड झाले होते. सदर चॅनलवर टेलिग्राम वापकरर्ता याने एका टेलिग्राम आयडीवरुन एक अनोळखी लिंक पाठवुन सदर लिंक मधील टास्क खरेदी करुन पुर्ण केल्यास १०००-१५०० रुपये नफा मिळेल अशा पोस्ट टाकत असे. त्यावेळी टेलिग्राम चॅनलवर इतर लोक देखील सदरचे टास्क खरेदी करुन त्यात मिळालेला नफा ग्रुप वर टाकत होते. त्यावेळी फिर्यादी यांची पण सदर टास्क खरेदी करुन नफा मिळवण्यासाठी इच्छा झाल्याने त्यांनी सदर ऑनलाईन टास्क ३३०००/- रुपयांना खरेदी केले व ते पुर्ण केल्याने फिर्यादी यांना ५०००/- रुपये नफा दाखवण्यात आला होता. फिर्यादी यांनी गुंतवणुक केलेली रक्कम व मिळवलेला नफा परत करण्यासाठी विनंती केला असता फिर्यादी यांना सदरची गुंतवणुक रक्कम व नफा फिर्यादी यांना परत न केल्याने व फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.२९३/२०२४ भादंवि कलम ४०६,४१९,४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६-डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी कर्नाटक बैंक चे पिंपरी शाखेचे ब्रांच मॅनेजर यांनी देखील त्याचे बँकेमध्ये ३४ पेक्षा अधिक खाती दोन महिन्यामध्ये उघडण्यात आली असुन त्यामध्ये संशयास्पद व्यवहार होत असुन त्याबाबत सायबर तक्रारी प्राप्त होत असल्याचे कळविले होते.

सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास सायबर सेलकडील पोशि अतुल लोखंडे व श्रीकांत कबुले हे करत असताना दाखल गुन्हयामध्ये अंकाउट उघडणारे अंकाउट धारक व त्यांना अंकाउट उघडण्यास लावणारे इसम हे दापोडी व पिंपरी चिंचवड, पुणे शहर परिसरातील असल्याने सदर इसमांचा शोध घेणेबाबत पोनि वैभव शिंगारे यांनी सहा.पो.नि.प्रवीण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउपनि रविंद्र पन्हाळे व पथक यांना आदेशित केले होते. त्याअनुषगाने सदर टिमने सदर इसमांचा शोध घेतला असता कर्नाटक बैंक शाखा पिंपरी यांचेकडील कर्नाटक बैंक अकाऊंट चा खातेधारक १) अल्ताफ मेहबूब शेख (वय २४ वर्ष) व्यवसाय खाजगी नोकरी रा. पवार चाळ, पवार नगर, जुनी सांगवी, पुणे याचेकडे चौकशी केली असता त्याने नमुद खाते व फेडरल बैंक येथील खाते इसम नामे २) मनोज शिवाजी गायकवाड (वय २३ वर्ष), व्यवसाय मजुरी रा.फ्लॅट नंबर एफ १६, गणेश हाईटस दापोडी, पुणे व ३) अनिकेत भाऊराव गायकवाड (वय २२ वर्षे) रा.नवी सांगवी, एम.के चौक, संत तुकाराम नगर, पुणे. यांचे सांगणेवरुन काढले आहे व सदरचे खाते उघडुन मनोज गायकवाड यांस देवुन त्याचेकडुन सदरचे ०२ अकाऊंट उघडण्यासाठी ४०००/- रुपये रोख स्वरुपात स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत मनोज गायकवाड यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता मनोज गायकवाड याने ४) हाफिज अली अहमद शेख रा. सर्व्हे नं ७१/२ नवीन गुलाब नगर, दापोडी, पुणे यास सदरची खाती सायबर फसवणुकीसाठी दिल्याचे सांगितले आहे व त्याबदल्यामध्ये त्याचेकडुन प्रत्येक खात्यासाठी ५०००/- रुपये घेतल्याचे सांगितले आहे. तसेच तसेच कर्नाटक बैंक खातेबाबत चौकशी करता खातेधारक ५) पवन विश्वास पाटील, (वय-२२ वर्षे), व्यवसाय खाजगी नोकरी,रा.२०/१५३, संत तुकाराम नगर, पिंपरी. याने देखील इसम नामे ६) चैतन्य संतोष आबनावे (वय २१ वर्षे) रा.प्लॅट नं ०२, गणराज हाईटस, नवीन लक्ष्मीनगर लेन नं ०६, पिंपळे गुरव पुणे. याचे सांगणेवरुन सदरचे खाते काढले असल्याचे सांगुन त्याबदल्यामध्ये चैतन्य आबनावे याचेकडुन रोख स्वरुपात २०००/- रुपये स्वीकारले असुन चैतन्य आबनावे याने सदरचे खाते इसम नामे ७) सौरभ रमेश विश्वकर्मा (वय २३ वर्षे), व्यवसाय मजुरी, रा. सव्र्व्हे नं २०/२१, मैफिल हॉटेल जवळ, भालेकर नगर, पिंपळे गुरव यास देवुन त्याबदल्यामध्ये त्याचे स्वतःसाठी १५००/- रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी सौरभ विश्वकर्मा याचेकडे चौकशी करता त्याने सदरची खाती आरोपी ८) कृष्णा भगवान खेडकर (वय २७ वर्षे), व्यवसाय शेती, रा. मु.पो. घाटशीळ पारगाव, ता. शिरुर जि. बिड यास देवुन त्याबदल्यामध्ये प्रत्येक खात्यासाठी ५०००/- रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयामध्ये वर नमुद आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला असल्याने त्यांना दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. यातील अटक आरोपी यांनी अंकाउट धारक यांना प्रत्येक खात्यासाठी २०००/- रुपये देवुन त्याचे नावावर कर्नाटक बैंक, फेडरल बैंक, इक्विटास बैंक व साउथ इंडियन बैंकमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. सदर खातेधारकांबाबत तपास चालु असुन आरोपी किरण खेडकर व हाफिज शेख हे ज्या इसमांना अंकाउट पुरवत होते त्यांचा शोध चालु आहे. दाखल गुन्हयामध्ये ०८ आरोपी यांना अटक करण्यात आली असुन त्यांनी उघडलेल्या ५० पेक्षा अधिक बैंक खात्याद्वारे अदयापपर्यंत १६ तक्रारी महाराष्ट्रामध्ये प्राप्त असुन नमुद खात्याद्वारे २० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची लोकांची फसवणुक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीना फेडरल बँक अंकाउट उघडुन देणा-या इसमांची चौकशी चालु आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास वपोनि, वैभव शिंगारे सायबर सेल, पिंपरी चिंचवड हे करत आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड, विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोउपनि नितीन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोशि बिच्चेवार, पोशि अतुल लोखंडे, पोशि श्रीकांत कबुले, पोशि सौरभ घाटे, पोशि अशोक जवरे, पोशि कृष्णा गवळी, पोशि रमेश कारके, पोशि सचिन घाडगे, पोशि अभिजित उकिरडे, पोशि स्वप्निल खणसे, पोशि सुरज शिंदे, पोशि आनंद मुठे, पोशि अनिकेत टेमगिरे, पोशि बळीराम नवले, मपोशि प्रिया वसावे, पोशि बनसोडे (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे. व्हॉटस्अपद्वारे किंवा इतर कोणत्याही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आलेल्या फसव्या लिंकला क्लिक करुन ऑनलाईन टास्क फ्रॉड, शेअर ट्रेडिंग फ्रॉड, फेडेक्स पार्सल फ्रॉड यासारख्या सायबर गुन्हयांना बळी पडु नये याकरिता दक्षता घेण्याचे आवाहन विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.