Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Proud Moment! शेतीवर कुटुंबाचा डोलारा, घराला छप्परही नाही; तरी ५वी पास बापाची तीनही मुलं बनणार डॉक्टर

11

नवी दिल्ली : राजेंद्र नागरचे कुटुंब अवघ्या फक्त दोन खोल्या असलेल्या घरात राहते. एका खोलीत छप्पर नाही आणि भिंतींवर प्लास्टर देखील नाही, तर दुसऱ्या खोलीत फक्त पत्र्याचे छप्पर आहे. या दोन खोल्यांच्या घरात राजेंद्र नागर हे आपली पत्नी मनभर आणि अंजली, अविनाश, अजय या तीन मुलांसह राहतात. दुसरी खोली तर नुसती पेंढ्याने भरलेली आहे. राजेंद्र आणि मनभर यांचे कुटुंब फक्त शेतीवर अवलंबून आहे. ज्या शेतीमध्ये घाम गाळून दोघेही कुटुंबाचा डोलारा चालवतात.

अशा सर्व अडचणींमध्ये एकाच कुटुंबातील तीन मुले डॉक्टर होतील, अशी कोणती आशा असेल का ओ? पण हे खरं आहे. अंजली आणि अविनाश सध्या वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत आहेत, तर अजय देखील मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होण्याच्या मार्गावर आहे. कठीण परिस्थितींचा सामना करत या तिघांनी हे यश कसे मिळवले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? त्यासाठी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील चालेत या गावी जावे लागेल, जिथे मुलांनी छोट्याशा झोपडीत राहून हा मोठा पराक्रम गाजवला आहे.

१०वी आणि बारावीत त्रिकुटाची चमकदार कामगिरी

राजेंद्र नागर व मनभर यांची तिन्ही मुले सुरुवातीपासूनच अभ्यासात अव्वल होती. यावर राजेंद्र आणि त्यांच्या पत्नीने ठरवले की, कितीही आर्थिक आव्हाने आली तरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे. अंजली, अविनाश आणि अजय यांनी त्यांच्या पालकांचा विश्वास खरा ठरवला आहे. तिघांचे दहावी आणि बारावीचे निकाल प्रत्येकी एक वर्षाच्या अंतराने जाहीर झाले तेव्हा त्यांनी चमकदार कामगिरी केली. अंजलीने दहावीत ९५ टक्के तर बारावीत ८२ टक्के गुण मिळवले. अविनाशला दहावीत ८२ टक्के तर बारावीत ९२ टक्के गुण मिळाले आहेत. यानंतर अजयने सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दहावीत ८२ टक्के आणि बारावीत ७२ टक्के गुण मिळवले आहेत.

NEET परीक्षेतही तिघांनीही गुणवत्ता यादीत मिळवले स्थान

बारावीनंतर अंजलीने NEET परीक्षेची तयारी सुरू केली. निकाल आल्यावर संपूर्ण गावाने राजेंद्र नागर यांचे अभिनंदन केले. २०२२ मध्ये झालेल्या NEET परीक्षेत अंजलीने ५८४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. ‘सध्या ती गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, जामनगर येथून वैद्यकशास्त्र शिकत आहे.’ मुलीच्या या घवघवीत यशाच्या एक वर्षानंतर, राजेंद्र नागरचा यांचा मोठा मुलगा अविनाश यानेही NEET मध्ये ६६० गुण मिळवले. ‘त्याला एम्स संस्थेत, देवघर, झारखंडमध्ये प्रवेश मिळाला आहे.’

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल कुटुंबाते पंचक्रोशीत होतेय कौतुक

दोन्ही मोठी भावंडांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची किमया साधल्यानंतर अजयलाही मागे राहायचे नव्हते. २०२४ मध्ये, अजयने NEET परीक्षेत ६६१ गुण मिळवले आणि आता त्याला वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळणे बाकी आहे. राजेंद्र नागर यांनी स्वत: पाचवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे, तर त्यांची पत्नी मनभर यांनी कधीही शाळेची पायरी चढली नाही. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आणि त्यागाबद्दल संपूर्ण गाव त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही तिन्ही मुलं आज आयुष्यातील अडचणी आणि अपयशानंतर हार मानणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श उदाहरण बनली आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.