Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिल्लीतील रुग्णावर गुरुग्राममधून ऑपरेशन, रोबोट तंत्रज्ञानाचा चमत्कार; भारतात पहिल्यांदाच झाली अशी कठीण शस्त्रक्रिया
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. डॉक्टर आणि रोबोटमध्ये एक कनेक्शन आवश्यक होतं. दोघंही एकमेकांपासून जवळपास ४० किमी दूर होते. संपूर्ण शस्त्रक्रिया एक तास ४५ मिनिटं सुरू होती.
सर्जिकल रोबोट मंत्र काय आहे?
या शस्त्रक्रियेवेळी सर्जनने कन्सोलच्या माध्यमातून रोबोटिक इन्स्ट्रूमेंट नियंत्रित केलं. यादरम्यान, रुग्णाला आरजीसीआयआरसीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी त्या रुग्णांची देखभाल केली. ही सर्वात किचकट शस्त्रक्रिया भारतात पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
दिल्लीत राहणाऱ्या ५२ वर्षीय रुग्णाला युरिनरी ब्लेडर कर्करोग होता. त्यांच्यावर डॉ. एसके रावल यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांनी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या तब्येतीबाबत अपडेट दिलं आहे. रुग्णावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर तो आता पूर्णपणे बरा असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
डॉ. एस.के. रावल म्हणाले की, भारतात तयार करण्यात आलेल्या या सर्जिकल रोबोमध्ये लहान शहरं आणि दुर्गम ठिकाणी आरोग्य सेवेत मोठी क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. या रोबोट्सच्या मदतीने एक्सपर्ट सर्जन दुर्गम ठिकाणीही ऑपरेशन करू शकतात. या तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना स्वत: शारीरिकरित्या उपस्थित राहण्याची गरज नसेल. भारतात बनवलेल्या या रोबोट्समुळे सर्जन दूरवरुन ऑपरेशन करू शकतात. या रोबोट सर्जरीमध्ये अचूक शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाला केवळ ४ ते ५ सेमी शस्त्रक्रिया करणाऱ्या भागावर कट करावं लागतं. त्याऐवजी ओपन सर्जरीमध्ये शरीरावर १५ ते २० सेमी लांब कट द्यावे लागतात. यामुळे रोबो तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना रुग्ण कुठे आहे या पर्वा न करता कोणत्याही ठिकाणी असलेल्या रुग्णावर आवश्यक ती शस्त्रक्रिया किंवा देखभाल करता येऊ शकते.