Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कट्टर इस्लामी देशाचा क्रांतिकारी निर्णय, गर्भपाताला परवानगी, मात्र वाट ‘अटी’तटींची

8

दुबई : कट्टरवादी इस्लामिक देश संयुक्त अरब अमिरातीने (UAE) महिलांसाठी गर्भपात कायद्यात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात नवीन कायदेशीर सुधारणांनुसार आता महिलांना गर्भपात करण्याची परवानगी दिली जाणार. पण, ही मान्यता काही विशेष परिस्थितीतच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार आणि व्याभिचार या घटनांमध्ये महिलेस गर्भपात करण्याची परवानगी दिली जाणार. तसेच १२० दिवस म्हणजे ४ महिन्यापेक्षा कमी वयाचे गर्भ असल्यास गर्भपात करण्याची परवानगी असेल.एका मंत्रिमंडळाच्या प्रस्तावात सांगण्यात आले की, जर गरोदर स्त्री ही बलात्कार किंवा व्याभिचाराला बळी पडली असेल तर गर्भपात करण्याची त्या स्त्रीला परवानगी असेल. या सोबतच अशी अट घालण्यात आली की, सार्वजनिक अभियोगाने याचा अहवाल देणे आणि पुष्टी केली पाहिजे. केवळ १२० दिवस म्हणजे ४ महिन्यापेक्षा कमी वयाचे गर्भ असल्यास गर्भपात करण्याची परवानगी असेल.
Hinduja Family: हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! घरगुती नोकरासोबत गैरवर्तन, ४ जणांना तुरुंगवासाची शिक्षा

काय असतील अटी?

मंत्रिमंडळाच्या प्रस्तावात म्हटले की, ‘ जर महिलेच्या इच्छेविना, तिच्या संमतीशिवाय किंवा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध बनवल्यास गर्भपात करण्याची परवानगी दिली जाणार. तसेच ज्या व्यक्तीमुळे गर्भधारणा झाली असेल किंवा त्या महिलेचा महरम नातेवाईक असेल.’ इस्लाममध्ये, महरम हे कुटुंबातील त्या सदस्याला बोलले जाते, ज्याच्या सोबत लग्न करणे बेकायदेशीर मानले जाते.’ महरम केलेल्या व्यक्ती सोबत महिलेला बुरखा घालणे बंधनकारक नसते.
Shocking News: शेतात काम करताना हात कापला, जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडलं, इटलीत भारतीय मजुराचा तडफडून मृत्यू

महिलांसाठी सकारात्मक पाऊल

नवीन कायद्याचा उद्देश महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा यांचे हित राखणे आहे. जाणकारांनी या प्रस्तावाचे कौतुक करत सांगितले की, शासनाचे हे युएईमधील महिलांसाठी एक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल आहे. गर्भधारणेला वैध केल्यामुळे महिलांचे संरक्षण होईल. कायद्यात तरतूद आहे की, महिलेचा जीव धोक्यात न घालत गर्भपात केले जावे.

सध्या काय आहे कायदा?

युएईमधील सध्याच्या कायद्यानुसार, जर आईच्या जीवाला धोका किंवा बाळास काही अपंगत्व असेल तरच गर्भपात करण्याची परवानगी होती. ही सुधारणा युएईच्या गर्भपात कायद्यातील बदलांच्या मालिकेतील नवीनतम आहे, ज्यामध्ये पती पत्नीच्या संमतीशिवाय आपत्कालीन गर्भपात करण्याची मान्यता यात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.