Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सोसायटीच्या लिफ्टबद्दल ही काळजी घेतल्यास टळेल मोठी दुर्घटना, या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अनेकांच्या जीवाला धोका
लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की, लिफ्टमध्ये कोणत्या कारणांमुळे अशा घटना घडतात. तज्ञांच्या मते, लिफ्ट खराब होण्यामागे अनेक तांत्रिक कारणे असू शकतात. याची प्रमुख कारणे ही असू शकतात.
मेंटेनन्सची कमतरता
लिफ्टचा नियमित मेंटेनन्स आणि सर्विसिंग न केल्यामुळे तिच्या कार्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, वेळोवेळी मेंटेनन्स करणे आवश्यक आहे. जर कोणतीही त्रुटी आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ओव्हरलोडिंग
लिफ्टच्या निश्चित क्षमतेपेक्षा अधिक वजन लोड केल्यास लिफ्टच्या सिस्टिमवर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे ती नीट काम करू शकत नाही आणि खराब होऊ शकते.
वीजपुरवठ्यात समस्या
अनियमित वीजपुरवठा किंवा वोल्टेजमधील चढ-उतार लिफ्टच्या इलेक्ट्रिकल सिस्टिमवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे तिच्या कार्यात अडथळे येऊ शकतात.
जुनी आणि जीर्ण लिफ्ट
खूप जुनी लिफ्टस् ज्यामध्ये कोणतेही तांत्रिक अपग्रेडेशन झाले नाही, त्या वारंवार खराब होतात. वेळोवेळी त्यांचे पार्ट्स घासले जातात आणि त्या योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत.
सॉफ्टवेअरची समस्या
लिफ्टमध्ये वापरले जाणारे कंप्युटर सॉफ्टवेअरमध्ये बग्स किंवा त्रुटी असू शकतात, ज्यामुळे लिफ्ट चागल्या प्रकारे काम करू शकत नाही.
पर्यावरणाचा प्रभाव
तापमानातील बदल आणि धूळ यांसारख्या पर्यावरणीय परिस्थिती लिफ्टच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सिस्टिमवर परिणाम करू शकतात.
इमरजेंसी ब्रेक सिस्टम फेल
लिफ्टमधील आपातकालीन ब्रेक सिस्टममध्ये खर बिघाड झाल्यास लिफ्ट अचानक थांबू शकते किंवा कोसळू शकते, ज्यामुळे प्रवाशांसाठी हे धोकादायक ठरू शकते.
लिफ्टमध्ये अडकल्यास ही सिस्टीम करेल मदत
पॅनिक अलार्म सिस्टम: तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडल्यास, लिफ्टमध्ये अडकलेली व्यक्ती हा अलार्म वाजवू शकते. त्यामुळे सोसायटीत लावलेले हूटर जोरात वाजू लागतील, त्यामुळे अडकलेल्या व्यक्तीला मदत मिळते.
इंटरकॉम : हूटरवर प्रतिसाद न मिळाल्यास लिफ्टमध्ये अडकलेली व्यक्ती इंटरकॉमची मदत घेऊ शकते. लिफ्टमध्ये PTT (प्रेस टू टॉक) बटण आहे, जे थेट मुख्य सुरक्षा नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहे.
कॅमेरे : लिफ्टमध्ये कॅमेरे लावले असल्यास सुरक्षा नियंत्रण कक्ष लिफ्टमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर २४ तास लक्ष ठेवते. यामुळे कर्मचाऱ्यांना अपघाताच्या वेळी तात्काळ कारवाई करता येते.