Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
बाभुळगांव येथील खुनाचे प्रयत्नासह दरोडयाचे गुन्हयात MCOCA कलमवाढीस विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांची मंजुरी प्राप्त तर महागांव येथील दरोडयाचे गुन्हयात अधिक एक आरोपी अटक करुन आरोपीतांकडुन तपासात १५,४६,००० रु मुद्देमाल जप्त….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(५)मे २०२४ रोजी रात्री अंदाजे १२.०० वा. चे दरम्यान आकाश नामदेव जतकर वय २६ वर्ष, हा हळदीचा कार्यक्रम आटोपुन एकटा मोटार सायकलने आपले गावी पालोती येथे येत असतांना कोपरा बारड पुनर्वसन रस्त्याजवळुन जातांना डबलसिट असलेल्या मोटरसायकल स्वाराने त्यांची गाडी आडवी लावुन त्यास अडवीले तो त्यांना चुकवुन थोडा समोर गेला तेंव्हा दुसऱ्या एका पांढरे रंगाची अल्टो गाडीने त्याचा पाठलाग करुन त्याची मोटर सायकल अडवली व मोटर सायकल वरील दोन इसम व अल्टो वाहनातील तिन इसमांनी त्याचे पॅन्ट व शर्टचे खिशातील पैसे जबरीने काढतांना आकाश जतकर हा त्यांना विरोध करीत असल्याने हमको पहचानता नही क्या. चल निकाल जल्दी, इसकी आतडी बाहर निकालना पड़ेगा. जादा शहाना हो गया अशी शिवीगाळ करुन जबरदस्तीने आकाश जतकर याचे पॅन्टच्या खिशातील अंदाजे दोन ते अडीच हजार रुपये जबरीने काढले. तेव्हा आकाश जतकर यांनी त्या इसमांना विरोध केला असता त्या पाच इसमापैकी एकाने आकाश जंतकर यास चाकुने डावे कुशीत व कमरेचे जवळ भोसकले व डावे डोळयाजवळ सुध्दा चाकुचा घाव मारला व इतरांनी शिवीगाळ करीत त्याची अडवणूक केली तेंव्हा आकाश जतकर हा वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडला असता तेथून जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरील मुले धावत आल्याने ते सर्व इसम अल्टो गाडी व त्यांचेकडील मोटर सायकलने तेथून पळून गेले. अशा स्वरुपाची घटना घडली होती. घटने संबधाने आकाश जतकर याचे तकारीवरुन पोलिस ठाणे बाभुळगांव येथे अपराध क्रमांक २६७ / २०२४ कलम ३०७,३९७,३४१, २९४,२०१ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलिस ठाणे बाभुळगांव येथील सपोनि सुरज तेलगोटे हे करीत असतांना त्यांनी तपासादरम्यान गुन्हयात आरोपी १) यश संजय सुभेदार वय २३ रा. ग्रिनपार्क सोसायटी जुना उमरसरा, यवतमाळ, २) श्रेयस नंदकिशोर राऊत वय २३ रा. प्रेरणानगर,यवतमाळ, ३) शेख फारुख उर्फ लाली शेख अख्तर वय २७ रा. भारतनगरी भोसा रोड यवतमाळ, ४) तेजस संजय गायकवाड वय २७ रा. मंगेशनगर भोसा रोड, यवतमाळ + ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक असे एकुण ०५ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले यावरुन सदर आरोपींना अटक केली
नमुद गुन्हा हा संघटित गुन्हेगारीतुन केलेला असल्याचे तपासात दिसुन आल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ३ (१) (ii), ३ (२) व ३ (४) अन्वये वाढीव कलम समाविष्ट करण्याची परवानगी मिळणेबाबत चा प्रस्ताव पोलिस निरीक्षक पो.स्टे. बाभुळगांव एल.डी. तावरे यांनी तयार करुन पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मार्फतीने विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचेकडे मंजुरीकरीता सादर केला होता. सदर प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परीक्षेत्र अमरावती यांनी दिनांक २२/०६/२०२४ रोजी मंजुरी दिली असल्याने सदर गुन्हयात मकोका कायदयाचे कलम समाविष्ट करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ. दिनेश बैसाने हे करीत आहेत.
त्याच प्रमाणे पोलिस ठाणे महागांव येथील दि(२१)जुन रोजी उघडकीस आलेला दरोडया चा गुन्हा क्रमांक ३८८/२०२४ कलम ३९७ भादवि मध्ये दिनांक २१/०६/२०२४ रोजीच ठाणेदार मुकुटबण सपोनि संतोष मनवर यांनी गुन्हयातील आरोपी शिवाजी दत्ता गरड वय ३० वर्षे, रा. हिंगणी ता. माहूर जि. नांदेड यास मुकुटबण परिसरातून ताब्यात घेऊन तपासी अधिकारी यांचे ताब्यात दिले आहे. आजपावेतो एकुण तिन आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असुन स्थागुशा पथकाने मुंबई येथून ताब्यात घेतलेला आरोपी शिवाजी लक्ष्मण शेळके वय ३० वर्षे, रा. माळेगांव ता. कळमनुरी जि. हिगोली याचे कडुन तपासा दरम्याण गुन्हयात वापरेलेले महिन्द्रा एस यु व्ही ५०० हे चारचाकी वाहन व गुन्हयातील त्याचे वाटयावर आलेले नगदी ९९,००० हजार असा एकुण १०,९९,०००/- रुपयाचा मुद्देमाल तर आरोपी शिवाजी दत्ता गरड याचे कडुन त्याचे वाटयावर आलेले नगदी १,५०,००० व एक मोबाईल असा एकुण १,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे नमुद गुन्हयाचे तपासात आजपावेतो एकुण १५,४६,०००/- रुपयाचा मुद्देमाल आरोपींकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात मकोका कारवाई आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ, पोलिस निरीक्षक . लहु तावरे, ठाणेदार पो.स्टे. बाभुळगांव, सपोनि सुरज तेलगोटे पो.स्टे. बाभुळगांव, पोउपनि धनराज हाके, स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. तर महागांव येथील दरोडयाचे गुन्हयातील एका आरोपीची अटक कारवाई सपोनि संतोष मनवर, ठाणेदार पो.स्टे. मुकुटबण व त्यांचेकडील पोलिस अंमलदार पंकज पातुरकर यांनी पार पाडली आहे. तसेच सदर गुन्हयाचा तपास सपोनि मिलींद सरकटे पो.स्टे. महागांव यांनी करुन त्यांना तपासकामी सहाकार्य स्थागुशा कडील सपोनि गजनानन गजभारे, विवेक देशमुख, पोउपनि धनराज हाके व स्थागुशा कडील पथकाने केले आहे.