Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आता परिस्थिती अशी आहे की लोक सतत फोन वापरताना दिसतात. मग ते घरी असो किंवा रस्त्याने चालताना. आता अँड्रॉइड स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डिजिटल वेलबीइंग फीचर जोडण्यात आले आहे. रस्ता ओलांडतानाही अनेकांना फोनवर व्यस्त असल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण चालताना फोन वापरणे धोकादायक ठरू शकते. अशावेळी तुमच्या सुरक्षितेसाठी अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये Digital well being heads up ही सेटिंग चालू करा. हे सेटिंग नक्की काय आहे हे जाणून घेऊया.
Digital well being heads up फीचर
- डिजिटल वेलबीइंगमध्ये हेड्स अप फीचर सुरू करण्यासाठी, फोनच्या सेटिंग्जवर जा.
- फीचर एनेबल करण्यासाठी, आपण हेड्स अप फीचर पेजवर क्लिक करताच, आपल्याला या फीचरशी संबंधित आवश्यक माहिती मिळेल.
- तुमचा फोन वापरत असताना तुम्ही रस्त्याने चालत असाल तर हे फीचर तुम्हाला वेळोवेळी अलर्ट पाठवेल.
- हेड्स अप पेजवर लिहिलं आहे की ते सावधगिरीने वापरा, हेड्स अप फीचर तुमच्या सभोवतालच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठीचा पर्याय नाही.
Heads up फीचर कसे चालू करावे
- सर्व प्रथम, आपल्या Android फोनच्या सेटिंग्जवर जा आणि नंतर डिजिटल वेलबीइंग पर्यायावर क्लिक करा.
- डिजिटल वेलबीइंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला Reduce Interruptions सेक्शनमध्ये हेड्स अप फीचर मिळेल.
- या फीचरवर क्लिक करा.
- हेड्स अप फीचरवर क्लिक करताच तुम्हाला फीचरशी संबंधित माहिती मिळेल आणि स्क्रीनच्या तळाशी पुढील पर्याय दिसेल.
- Next वर क्लिक करा.
- तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करताच तुम्हाला तीन पर्याय मिळतील. फिजिकल ॲक्टिव्हिटी, नोटिफिकेशन आणि लोकेशन (ऐच्छिक).
- तुम्ही हे पर्याय चालू करा, हे पर्याय एनेबल केल्यानंतर, तुम्ही फोन हातात घेऊन चालत असताना, हे फीचर तुम्हाला रिमाइंडर पाठवेल.