Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Samsung Galaxy Unpacked Event 2024: फोल्डेबल फोनचा किंग पुन्हा घेऊन येतोय दमदार फोन; गॅलेक्सी झेड फोल्ड 6 सोबत ‘हे’ गॅजेट्स देखील आज होतील लाँच
Samsung Galaxy Unpacked Event 2024 आज फ्रान्समधील पॅरिसमध्ये होणार आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रोडक्ट लाँच केले जातील. ज्यात गॅलेक्सी झेड फोल्ड आणि गॅलेक्सी झेड फ्लिप सीरीज व्यतिरिक्त गॅलॅक्सी रिंग, गॅलॅक्सी बड्स 3 प्रो आणि गॅलॅक्सी वॉच 7 चा समावेश होऊ शकतो.
रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग या इव्हेंटमध्ये आपल्या ग्राहकांसाठी गॅलेक्सी रिंग देखील सादर करणार आहे. या डिवाइससाठी अनेक युजर्स उत्सुक आहेत. चला पाहूया या इव्हेंटमधून कोणते डिवाइस बाजारात येऊ शकतात यावर.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6
कंपनी या इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 6 सादर करू शकते. ज्यात 7.6 इंचाचा इनर डायनॅमिक अॅमोलेड 2X डिस्प्ले आणि 6.3 इंच कव्हर डिस्प्ले मिळू शकतो. फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट आणि 12GB रॅम+ 256GB सह 1TB स्टोरेज पर्यंतच्या ऑप्शनसह येऊ शकतो. फोन 50MP मेन लेन्ससह येऊ शकतो.Unihertz Jelly Max: जगातील सर्वात छोटू 5G फोनमध्ये मिळेल 12GB रॅम, चिपसेट देखील असेल दमदार
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6
या फोनचा एक मोठा फोकस Samsung Galaxy Z Flip 6 असेल. हा फोन कंपनी 6.7 इंचाच्या मेन डिस्प्ले आणि 3.9 इंचाच्या कव्हर डिस्प्लेसह येऊ शकतो. फोन युजर्सची गरज ओळखून वेगवेगळ्या रॅम स्टोरेज कॉन्फिगरेशन मध्ये हा हँडसेट येऊ शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी रिंग
या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपली स्मार्ट रिंग अर्थात Galaxy Ring सादर करू शकते. अशी चर्चा आहे की कंपनीची ही रिंग स्लीक डिजाइन आणि अॅडव्हान्स हेल्थ ट्रॅकिंग फीचर्ससह युजर्सना आकर्षित करू शकते. ही रिंग Black, Silver, आणि Gold कलर ऑप्शनमध्ये येऊ शकते आणि हेल्थ ट्रॅक करण्याचे काम करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी बड्स 3 प्रो
या इव्हेंटमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांसाठी Samsung Galaxy Buds 3 Pro घेऊन येऊ शकते. हा ऑडियो डिवाइस कंपनीच्या लेटेस्ट टीडब्लूएस इअरबड्स लाइनअप मध्ये येऊ शकतो. सॅमसंग हे बड्स सेमी ट्रान्सपरंट केस आणि स्टेम डिजाइनसह सादर करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा
कंपनी आपल्या या इव्हेंटमध्ये वियरेबल सेगमेंटमध्ये अनेक नवीन स्मार्टवॉच सादर करू शकते. या इव्हेंटमध्ये Galaxy Watch Ultra लाँच होऊ शकतो. हे वॉच अॅप्पल वॉचला टक्कर देऊ शकतो. कंपनी हे वॉच ड्यूरेबल सर्कुलर बेजल आणि टायटेनियम केससह येऊ शकतं.
सॅमसंग गॅलेक्सी वॉच 7
इव्हेंटमध्ये युजर्ससाठी Samsung Galaxy Watch 7 देखील सादर केला जाऊ शकतो. कंपनी हे वॉच ऑलिव्ह ग्रीन कलरसह येऊ शकतं. वॉचमध्ये फीचर्स जुने असतील. वॉच परफॉर्मन्स सुधारण्यासाठी Exynos W1000 चिपसेट मिळू शकतो.