Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Assembly By Elections Result : सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका
2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत मिळवत तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केलं. परंतु 400 पार चे लक्षं पूर्ण करू शकले नाही. भाजपला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी ठरली. अशातच आज पुन्हा एकदा सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
मतदारसंघ कोणते आहेत ?
पश्चिम बंगाल ,पंजाब, बिहार, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमधील 13 विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक पार पडली. आमदारांच्या निधनामुळे आणि राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. तमिळनाडूमधील विक्रवंडी, पश्चिम बंगालमधील बागडा आणि माणिकतला बिहार मधील राणाघाट दक्षिण, रुपौली, मध्यप्रदेशमधील अमरवाडा, पंजाबमधील जालंधर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, हिमाचल प्रदेशातील, हमीरपूर, नालागड आणि देहरा या मतदारसंघांचा समावेश होता. याच पोटनिवडणुकीत काँग्रेसने 4, TMC 4, भाजप 2 आणि AAP, DMK आणि अपक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होत राहील
कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी आपली निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”एक काळ होता ज्यात आम्ही अनेक निवडणुका हरलो.आता भाजपचा तो काळ आला आहे. त्यांचा देखील पुढील सर्व निवडणूकांमध्ये पराभव होत राहील”.
दरम्यान, काल महाराष्ट्र विधांनपरिषदेची निवडणूक पार पडली आहे. यामध्ये महायुतीने 9 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या 2 जागा निवडून आल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला.