Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गुरुवारी अभिषेक शर्मा याची वरात घेऊन शर्मा कुटुंबीय वधू सुष्मा हिच्या देवरिया येथील आनंद नगरात पोहोचले. लग्नविधी सुरु झाले आणि वधू वरांनी एकमेकांना पुष्पहार घातले. ही विधी पार पडताच वरपक्ष हा जेवणाच्या पंगतीकडे वळला. जेवणामध्ये शाकाहारी पदार्थांची मेजवानी पाहिली आणि त्यांची निराशा झाली. त्यांना राग अनावर होऊन त्यांनी वधू पक्षातील लोकांना ‘जेवणात मासे का नाही?’ असे विचारले.
रागात वर पक्षाकडील लोकांनी वधू पक्षातील नातेवाईकांना बेदम मारहाण केली, या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर वर पक्षातील लोकांना ताब्यात घेतले असून दोन्ही पक्षातील लोकांची चौकशी सुरु केली आहे.
वधूच्या आई मीरा शर्मा यांनी या घटनेबद्दल सांगितले की, हार घालण्याच्या विधीनंतर वराने विचारले जेवण काय बनवले आहे, यावर माझ्या मुलीने सांगितले की साधे शाकाहारी जेवण बनवले आहे. मुलाने मग मासे का नाही असे विचारले आणि मुलीला कानशिलात मारली. मुलाकडील लोकांना मला आणि माझ्या पतीलाही मारहाण केली आहे यासोबत आमच्या कुटुंबातील आणखी काही लोकांनाही जखमी केले.
देवरियातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारी करण्यासाठी पुढे सरसावलेल्या अभिषेक शर्मा, सुरेंद्र शर्मा, रामप्रवेश शर्मा, राजकुमार आणि आणखी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मुलीचे वडील आणि कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे, अशी माहिती देवरिया पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर यांनी दिली आहे.