Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Smartphone screen guard: स्मार्टफोनचे स्क्रीनगार्ड बसवतांना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर काही दिवसांतच होईल तुमचे मोठे नुकसान

12

Smartphone screen guard: कोणत्याही फोनमध्ये डिस्प्ले हा त्याचा सर्वात नाजूक भाग असतो. डिस्प्ले तुटल्यानंतर फोन निरुपयोगी होतो. फोनच्या डिस्प्लेला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य स्क्रीन गार्ड निवडणे आवश्यक आहे. या लेखात, फोनच्या स्क्रीन गार्डसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजच्या काळात स्मार्टफोन प्रत्येक व्यक्तीची मोठी गरज बनला आहे. स्मार्टफोनशिवाय कोणत्याही कामाची कल्पना करणेही शक्य नाही. ऑनलाइन पेमेंटपासून फोन कॉल आणि व्हिडिओ पाहण्यापर्यंत सर्वकाही फोनवरच केले जाते. मात्र डिव्हाइस वारंवार खरेदी करता येत नाही. एकदा फोन खरेदी केला की 2 ते 3 वर्षे ते वापरणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत फोनची सुरक्षा महत्त्वाची ठरते. फोनचा डिस्प्ले हा सर्वात नाजूक भाग आहे. डिस्प्ले तुटल्यानंतर फोन निरुपयोगी होतो. फोनच्या डिस्प्लेला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य स्क्रीन गार्ड निवडणे आवश्यक आहे. या लेखात, फोनच्या स्क्रीन गार्डसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती दिली आहे.

फोनच्या स्क्रीन गार्ड खरेदी करतांना लक्षात ठेवा या गोष्टी

अँटी स्क्रॅच

फोनसाठी स्क्रीन गार्ड निवडताना त्याच्या अँटी-स्क्रॅच प्रॉपर्टीजचा विचार करणे महत्त्वाचे आहे. फोनला गार्डसह कात्री, चावी, ब्लेड किंवा अशा कोणत्याही टणक वस्तूंमुळे स्क्रॅचेस पडणार नाही याची काळजी घ्या. अनेक वेळा फोन खिशात ठेवला जातो, अशा वेळी फोनसोबत चाव्या असणे फोनच्या स्क्रीनला नुकसान पोहोचवू शकते.

स्मूद टच फीलिंग

एक चांगला स्क्रीन गार्ड निवडताना त्याच्या स्मूद टचबद्दल विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही फोनच्या स्क्रीनवर कितीही वेळा बोट फिरवला तरी तुम्हाला स्मूद फीलिंग मिळणे आवश्यक आहे. फोनचा स्क्रीन गार्ड असा असावा की त्याला स्पर्श केल्यावर ऑरिजनल स्क्रीनसारखे फील यावे. हलक्या क्वालिटीचे स्क्रॅच गार्ड रफ ग्लास फर्मपासून बनवले जातात, जे स्मूद टच देऊ शकत नाहीत.

परफेक्ट साइज

स्क्रीन गार्ड फोनच्या स्क्रीनवर अगदी योग्य प्रकारे बसवला जातो. अशा परिस्थितीत फोनचा योग्य वापर होण्यासाठी स्क्रीन गार्डचा परफेक्ट साइज असणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की स्क्रीन गार्ड फोनच्या स्क्रीनला पूर्ण कव्हरेज देतो. तसेच, स्क्रीन गार्ड फोनवर असा लावला पाहिजे की त्यामध्ये हवेचा बबल दिसू नये.

अँटी फिंगरप्रिंट आणि ऑइल

फोनची गरज नेहमीच असते. अशा परिस्थितीत अनेक वेळा हात न धुता फोनचा वापर करावा लागतो. फोनवर पाणी, ऑइल आणि धूळ असलेल्या हातांचा टच होतो. अशा परिस्थितीत फोनचा स्क्रीन गार्ड अँटी फिंगरप्रिंट आणि ऑइल असावा. फोनवर बोटांचे निशाण दिसल्यास फोनच्या डिस्प्लेमध्ये क्लॅरीटीची समस्या येते.

शॅटर-प्रूफ

अनेक वेळा फोन हातातून पडतो. तो जमिनीवर पडल्यावर डॅमेज होऊ शकतो. अशा परिस्थितीत शॅटर-प्रूफ स्क्रीन गार्ड वापरणे आवश्यक आहे. फोनचा स्क्रीन गार्ड शॅटर-प्रूफ असल्यास फोनच्या ऑरिजनल डिस्प्लेला तुटण्यापासून वाचवता येईल. जमिनीवर पडल्यावरही फोनच्या डिस्प्लेला बऱ्याच अंशी वाचवता येते.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.