Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amazon Prime Day Sale 2024: लवकरच सुरु होईल ॲमेझॉनचा प्राईम डे सेल, Appleचा हा लोकप्रिय फोन स्वस्तात करण्याची संधी

10

Amazon Prime Day Sale 2024: ॲमेझॉन प्राइम डे सेल 2024 दरम्यान iPhone 13 फोन आकर्षक ऑफर्स सह खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये हा फोन 31,000 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत मिळत आहे. कशी असेल ही डील जाणून घेऊया..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Appleचा iPhone 13 हा जगभरात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे, हा फोन Amazon प्राइम डे सेल 2024 दरम्यान मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहे. Amazon चा प्राइम डे सेल 20 जुलैपासून सुरू होईल आणि 21 जुलै रोजी संपेल. या Amazon सेलमध्ये Apple च्या अधिकृत वेबसाइटशी तुलना केल्यास, iPhone 13 खूपच स्वस्त असणार आहे. आम्ही तुम्हाला Amazon सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

iPhone 13 वर बंपर सुट

आयफोन 13 Amazon प्राइम डे सेल 2024 दरम्यान 47,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. या डीलमध्ये बँक ऑफर, ॲमेझॉन कूपन आणि डिस्काउंट समाविष्ट आहेत. जर तुम्ही तुमचा जुना फोन विकून नवीन फोन खरेदी केला तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळू शकते. iPhone 13 79,900 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. उल्लेखनीय आहे की iPhone 15 सीरीज लॉन्च केल्यानंतर Apple ने iPhone 13 ची किंमत 59,900 रुपयांपर्यंत वाढवली होती. म्हणजेच आता हा फोन 10,000 रुपयांनी स्वस्त होत आहे.

जर तुम्हाला Amazon ऐवजी इतर कुठल्याही साइटवरून iPhone 13 विकत घ्यायचा असेल तर Apple च्या वेबसाइटवर 59,900 रुपये, Vijay Sales वर 51,990 रुपये आणि Croma वर 52,090 रुपये किंमतीला विकला जात आहे. Flipkart वर iPhone 13 ची किंमत सध्या 51,999 रुपये आहे. या किंमती बेस 128GB वेरिएंटसाठी आहेत.

आकर्षक किंमतीत खरेदी करता येईल iPhone 13

iPhone 13 मध्ये 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्लेसह अनेक प्रभावी फिचर्सचा समावेश आहे. हे डिव्हाइस A15 बायोनिक चिपसेटसह येते. iPhone 13 ची बॅटरी 3,240 mAh आहे आणि ती लेटेस्ट iOS वर चालते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 13 मध्ये 12MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 12MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेल्फी, व्हिडिओ कॉल इत्यादीसाठी आहे. तर, जर तुमचे बजेट कमी असेल पण तरीही तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर तुम्ही iPhone 13 खरेदी करू शकता.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.