Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Bharatiya Antariksha Station: पृथ्वीपासून 450 किमी उंचीवर राहू शकतील 6 लोक; भारतीय अंतरिक्ष स्टेशनची नवीन डिजाइन आली समोर

8

Bharatiya Antariksha Station ची नवीन डिजाइन समोर आली आ ग. यात 5 मेटालिक मॉड्यूल्स असतील. यांचं वजन दुप्पट करण्यात आलं आहे. आता या मॉड्युल्सच वजन सुमारे 52 टन झालं आहे. ज्यात जास्तीत जास्त 6 अ‍ॅस्ट्रोनॉट्स राहू शकतात. यात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन प्रमाणे कुपोला देखील असेल. चला जाणून घेऊया भारतीय अंतरिक्ष स्टेशनमध्ये काय काय असेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Bhartiya Antariksha Station (BAS) ची नवीन लेटेस्ट डिजाइन आता सर्वांसमोर आली आहे. भारताच्या या स्पेस स्टेशनचे एकूण वजन जवळपास 52 टन असेल. हे स्टेशन 27 मीटर म्हणजे 88.58 फूट लांब आणि 20 मीटर म्हणजे 65.61 फूट रुंद असेल.

भारताच्या स्पेस स्टेशनमध्ये साधारणतः 3 ते 4 अ‍ॅस्ट्रोनॉट्स राहतील परंतु गरज पडल्यास 6 अ‍ॅस्ट्रोनॉट्स को रख इथे आश्रय घेऊ शकतात. आधी याचे वजन 25 टन होतं. यात फक्त 3 अ‍ॅस्ट्रोनॉट्स राहू शकतात, ते देखील फक्त 15 ते 20 दिवसांसाठी. परंतु नवीन डिजाइनमध्ये स्पेस स्टेशन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पेक्षा देखील चांगलं बनवलं जात आहे. ISRO च्या नियोजनानुसार भारतीय स्पेस स्टेशन 2035 पासून कार्यरत होईल.
Einstein Ring: अंतराळात दिसली ‘आइंस्टाईन रिंग’, जगातील सर्वात मोठ्या स्पेस टेलिस्कोपने घेतला ‘हा’ फोटो

या स्पेस स्टेशन मध्ये नवीन युनिवर्सल डॉकिंग आणि बर्थिंग सिस्टम असेल. ज्यामुळे गरज पडल्यास दुसऱ्या देशांचे स्पेसक्राफ्ट या स्टेशनला जोडले जाऊ शकतात. रोल आउट सोलर अरे देण्यात येतील जे गरज पडल्यास अंतराळातील कचऱ्यापासून वाचण्यासाठी फोल्ड करून ठेवता येतील.

स्टेशनवर प्रोपेलेंट रीफ्यूलिंग आणि सर्व्हिसिंगची व्यवस्था असले. तसेच नवीन एव्हीयोनिक्स आणि कम्यूनिकेशन सिस्टम दिली जाईल. त्याचबरोबर इनर्शियल कंट्रोल सिस्टम असेल. हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 400 ते 450 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करेल. अंतराळातील कचरा, दगड आणि उल्कापासून वाचण्यासाठी स्पेस स्टेशन वर खाली करता करता यावे म्हणून एवढे अंतर ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इसरोला 2035 पर्यंत भारतीय स्पेस स्टेशन बनवणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अ‍ॅस्ट्रोनॉट पोहचवण्याचे लक्ष्य दिले आहे. इसरो सध्या बोईंग, ब्लू ओरिजिन आणि वॉयजर सारख्या अमेरिकेतील प्रमुख कंपन्यांशी चर्चा करत आहे. जेणेकरून काही प्रोजेक्ट त्यांच्या मदतीनं पूर्ण करता येतील.

अमेरिकन स्पेस स्टेशनवर जाणार भारतीय अ‍ॅस्ट्रोनॉट

गेल्यावर्षी अमेरिकन अंतरिक्ष एजेंसी NASA चे प्रमुख बिल नेल्सन भारतात आले होते. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की भारतीय स्पेस स्टेशन बनवण्यासाठी अमेरिका आणि नासा दोन्ही मदत करण्यास तयार आहेत. बिल नेल्सन यांनी सांगितलं की अमेरिका आणि भारत मिळून योजना बनवत आहेत की 1-2 वर्षात भारतीय अ‍ॅस्ट्रोनॉट International Space Station (ISS) वर पाठवले जातील.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.