Mumbai News: मुंबईच्या मालाडमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अन्य तीन मजूर जखमी झाले आहेत.
मुंबई: पश्चिम उपनगरातील मालाडमधील एका इमारतीचं काम सुरु असताना सहा मजूर खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोसळलेल्या सहा मजुरांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडली. मालाड पूर्वेला असलेल्या गोविंद नगरातील हाजी बापू रोड परिसरात नवजीवन इमारतीचं काम सुरु आहे. बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळल्यानं दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.
नवजीवन सोसायटीच्या निर्माणाधीन इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब दुपारी पाऊणच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. त्यांच्यावर एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवजीवन सोसायटीच्या इमारतीचं गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. ही इमारत २३ मजल्यांची असणार आहे. सध्याच्या घडीला घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा