मध्य-हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा, पुण्यात मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरार

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या तसेच, विघ्नहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, शनिवारपासून सुरू होत आहे. मुंबईसह राज्यभरातील भक्त गणरंगात न्हाऊन निघाले असून आजपासून सर्वत्र मोरयाचाच जयघोष चालणार आहे.
२. दीड दिवसाच्या गणरायाला रविवारी दुपारनंतर विसर्जनाला सुरुवात होणार असल्याने विसर्जनासाठी मित्र-परिवारांकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने मशीद ते कुर्लादरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर मेगाब्लॉक घोषित केला आहे. बातमी वाचा सविस्तर…

३. ‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास असून, नागरिक त्यांना पालक म्हणून पाहत आहेत. मात्र महायुतीकडे कोणता चेहरा आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असे विचारत आहेत’, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले.

४. : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा त्वरीत करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरदार कामाला लागले आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

५. केंद्रातील हेविवेट मंत्री नितीन गडकरी हे विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. तब्बल एक महिना ते मैदानात राहतील. लोकसभा निवडणुकीत भाजपला जबरदस्त फटका बसला. बड्या नेत्यांच्या सभा, दौरे आणि बुथ पातळीवरील व्यवस्थापनाचा लाभ झाला नाही. महाआघाडी आणि महायुतीत मतांच्या टक्केवारीत विशेष फरक नाही. हे अंतर भरून काढण्याचे नियोजन भाजपने केले आहे. त्यासाठी तब्बल दशकभरानंतर गडकरी हे राज्यात सक्रिय होतील.

६. जेवण नाकारल्याने मध्यधुंद अवस्थेतील चालकाने मोठा राडा केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार पाहायला मिळाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोडलगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एका कारसह हॉटेलचे प्रचंड नुकसान केले आहे. बातमी वाचा सविस्तर…

७. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये सोमनाथ एक्प्रेसचे दोन डब्बे रेल्वे ट्रॅकवरुन उतरुन अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सोमनाथ एक्सप्रेसचे सुरुवातीचे दोन डब्बे रेल्वे ट्रॅकवरुन खाली उतरले. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देखील रेल्वेने दिली आहे.

८. UP T20 लीग 2024 मध्ये भुवनेश्वर कुमारने आपल्या तगड्या गोलंदाजीने कहर केला. युपी फाल्कन्सकडून भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या चार षटकांत फक्त 4 धावा दिल्या. यादरम्यान त्याने एक ओव्हर मेडन टाकला. त्याला विकेट मिळाली नसली तरी काशी रुद्रच्या फलंदाजांना त्याने गुडघ्यावर टेकण्यास भाग पाडले.

९. मुंबईत सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचा उत्सव असताना मुलुंडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मुंबईतील मुलुंड येथे हिट अँड रनची भीषण घटना घडली आहे. या अपघातात एका बीएमडब्ल्यू कारने गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना उडवलं आहे. या अपघातात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. बातमी वाचा सविस्तर…

१०. बिग बॉस मराठी ५ सुरू झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या शोचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. तेव्हा सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटी मंडळीही आवडीने हा शो पाहतात. यंदाच्या शोमध्ये पहिल्याच आठवड्यापासून घरात मोठमोठा धिंगाणा सुरू झाला होता. मराठीची सुपरस्टार वर्षा उसगावकर यावेळी स्पर्धक म्हणून या घरात खेळत आहे पण त्यांच्यावरून सुद्धा बरेच वाद झालेले पाहायला मिळतात.

Source link

maharashtra times newstoday highlightstoday top 10 newsTop 10 Newsआजच्या टॉप १० बातम्याआजच्या ठळक घडामोडीटॉप १० बातम्यामहाराष्ट्र टाइम्स बातम्या
Comments (0)
Add Comment