लोकसभेत आमचा पद्धतशीर कार्यक्रम, पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर…; अजित दादांची तुफान फटकेबाजी

Ajit Pawar Baramati Rally: ”परत परत निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीय. सरकारला ३५८ तालुके सांभाळायचे आहेत. त्या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्या वडिलधाऱ्या माणसांनी सांगितलं पाहिजे”.

हायलाइट्स:

  • बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला..!
  • …. आणि म्हणायचं मलिदा गॅंग..!
  • अजित पवारांच्या सभेत हशा पिकला
Lipi
अजित पवार बारामती निवडणूक सभा

दीपक पडकर, पुणे (बारामती) : ”साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे लोकसभेला पवार साहेबांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. लोकसभेच्या काळात जर काही झालं. तर ते कोणाला आवडणार नाही. या सर्वांचा विचार करून तुम्ही पद्धतशीर आमचा कार्यक्रम केला..! आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर..! करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही पण तो कार्यक्रम स्वीकारला” अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील ग्रामस्थांशी पवारांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ”लोकसभेला आमचा करेक्ट कार्यक्रम केला. तो कार्यक्रम आम्ही स्वीकारला. आपल्याच लोकांनी तो कार्यक्रम केल्याने न स्वीकारून काय करता..! पवार यावेळी म्हणाले. लोकसभेला अनेकांनी काय काय केलं…हे सर्व बुथ बघितल्यावर लक्षात येतं. आता मात्र मी तुमच्याकडे हक्काने आलो आहे. मी ज्या वेळेस तुमची आमदारकी स्वीकारली. तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुठेही आळशीपणा दाखवला नाही. मी कुठेही कामात आणि निधी देण्यात कमी पडलो नाही”, अशी साद अजितदादांनी जनतेला घातली.
Amit Thackeray : उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणाला ‘तो बालिश आहे’, अमित ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, बायकोलाही हसू अनावर

…. आणि म्हणायचं मलिदा गॅंग..!

”काय काय जण विकास कामे घेतात. मात्र त्याचा दर्जा इतका खालवतात आणि पुढे तेच काम सहा सहा महिन्यात खराब होऊन जातात. त्यामुळे माझी बदनामी होते. मग निघतं मलिदा गॅंग..! हेच काम जर शेजारच्या तालुक्याला दिले. तरी ते म्हटले असते बघा, बाकीच्या तालुक्यांना फायदा करून देतात आणि आपल्या तालुक्यातील लोकांना वाऱ्यावर सोडतात. तरुण तरुणींनी कुठे जायचं…अरे इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं, हे नको का कळायला? मी कुणाला पाठीशी घालतोय की कुणाच्या कामावर पांघरुन घालून वेडवाकडं काम करुन घेतलं आहे?” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

”परत परत निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीय. सरकारला ३५८ तालुके सांभाळायचे आहेत. त्या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्या वडिलधाऱ्या माणसांनी सांगितलं पाहिजे. कुणीही स्वत:चा इगो ठेवू नका, प्रत्यकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाहीतर रागारागाने निघून जायचं, तुम्ही जाणार पण माझं काय होणार?” असं मिश्किल टिप्पणी केल्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

ajit pawar baramati election meetingAjit Pawar Newsmaharashtra assembly election 2024ncpअजित पवार बातम्याअजित पवार बारामती निवडणूक सभामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकराष्ट्रवादी कॉंग्रेस
Comments (0)
Add Comment