संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट ठरली, ‘ही’ आहे वेळ आणि ठिकाण

हायलाइट्स:

  • संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट ठरली
  • आज पुण्यात या दोन्ही राजांची भेट होणार
  • उदयनराजे भोसले संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का?

पुणे : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यात मात्र वातावरण चांगलंच पेटलं. यामुळे पुन्हा एकदा मराठा मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे एकत्र येत आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे. याचमुळे आज पुण्यात या दोन्ही राजांची भेट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले भेटणार असून त्यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मोर्चाविषयी चर्चा होणार आहे. राज्यात १६ जूनपासून मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. संभाजीराजे छत्रपती हे सध्या मोर्चाचं नेतृत्त्व करत आहेत. त्यामुळे या दोन्ही राजांची बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुंबईकरांचे हाल! एसटी बसेसची सेवा आजपासून बंद

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयमी, पण आग्रही भूमिका घेणारे खासदार संभाजीराजे भोसले यांनी अखेर आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन मूक असून १६ जूनपासून सुरू होणार आहे. ‘आम्ही बोललो, आता तुम्ही बोला’, असं या आंदोलनाचं घोषवाक्य असून आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदारांना बोलावून भूमिका मांडण्याची विनंती केली जाणार आहे. या मूक आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्यास मुंबईत विराट ‘लाँग मार्च’ काढला जाईल आणि तो सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

या मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येनं मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे जर यामध्ये उदयनराजेंनीही हजेरी लावली तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. यामुळे उदयनराजे भोसले हे संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का, हेदेखील पाहावे लागेल.

असं होणार मूक आंदोलन

येत्या १६ जून पासून मूक आंदोलनाला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी कोल्हापुरात हे आंदोलन होईल. नंतर टप्प्याटप्प्यानं सर्व जिल्ह्यात आंदोलन होईल. आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. तिथं आंदोलकांपैकी कुणीच बोलणार नाही, तर लोकप्रतिनिधींना बोलण्याची विनंती केली जाणार आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडायची आहे. स्वतःची जबाबदारी निश्चित करायची आहे.
आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही; अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराज परखड बोलले!

Source link

maratha aarakshanMaratha Morcha MumbaiMaratha Reservationmaratha reservation latest newsmaratha reservation supreme courtPune newssambhaji raje and udayan rajesambhaji raje bhosale and udayanraje bhosale
Comments (0)
Add Comment