तुम्ही एकमेकांना जोडे मारा, पण…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा प्रस्ताव आज पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा घेण्यासाठी अधिवेशन मोठ्या कालावधीसाठी घेण्याची विरोधकांची मागणी असताना पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकार जोरदार टीकास्त्र सोडले. (opposition leader devendra fadnavis criticizes thackeray govt)

एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन होऊ शकते. तर दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालते, पण, राज्याच्या विधिमंडळामध्ये करोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

राज्यावर करोनाचे संकट आहे याची आम्हाला कल्पना आहे. करोनाची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. मात्, करोनाचा बहाणा करत अधिवेशन घ्यायचे नाही हा सरकारचा प्रयत्न आहे. एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन होऊ शकते. तसेच दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालते. पण, करोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही. अशी सरकारची मानसिकता आहे. सरकारचा प्रस्ताव हा दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा आहे. म्हणूनच आम्ही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून आम्ही बाहेर पडलो, असे फडणवीस म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी पर्याय देऊ: फडणवीस

आज महाराष्ट्रासमोर कितीतरी प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. पण शेतकऱ्यांच्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारला वेळ नाही. विद्यार्थी तणावात आहेत, पण सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ नाही. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे. असे असतानाही मोठे अधिवेशन न घेता अधिवेशनात चर्चाच टाळण्याचा प्रयत्न दिसतोय, असा आरोप फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

‘शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र’

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आलेले आहेत. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचे मोठे नुकसान होत आहे, असे सांगताना तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का करता?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा- कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सुचवा; भातखळकरांचा टोला

Source link

Devendra Fadnavismahavikas aghadiदेवेंद्र फडणवीसपावसाळी अधिवेशनफडणवीसांची आघाडी सरकारवर टीका
Comments (0)
Add Comment