(संपादक-शैलेश चौधरी)
एरंडोल;-हिंगोणे खुर्द! तालुका धरणगाव येथील रेशन दुकान नंबर ८२ मध्ये अनेक गैरप्रकार व गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आदीवासी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी एरंडोल विनय गोसावी यांच्याकडे केली आहे.
भिल्ल समाज विकास मंच या संघटनेच्या माध्यमातून सदर तक्रार करण्यात आली आहे.
स्वस्त धान्य कमी वाटप करणे,ऑनलाईन पावती कार्डधारकांना न देणे,पावती मागितली असल्यास अरेरावीची भाषा करणे,कार्डधारकांना धमक्या देणे अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जाती-जमातीच्या गरीब व अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेऊन धान्य कमी देण्याचा प्रकार येथे होत आहे.
धरणगाव तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत तरी या प्रकरणी सखोल चौकशी होऊन सदर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी भिल्ल समाज विकास मंच संघटनेतर्फे करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा अध्यक्ष दिपक अहीरे,ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मालचे,विजय ठाकरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.