राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात; लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांचा पक्षप्रवेश

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात
  • लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांचा पक्षप्रवेश
  • राष्ट्रवादीत लोक कलावंतांना मिळणार मोठी संधी

पुणे : आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण आता पेटताना दिसत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या राजकीय नेत्यांचे इन्कमिंग सुरू झाले आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि तमाशा सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी नेत्यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये काम करण्याची इच्छा मंगलाताई बनसोडे आणि रघुवीर भाऊंनी व्यक्त केली होती. त्यावर आज ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मंगलाताई बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. तर लवकरच हे दोघेही कलावंत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची धुरा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘मोदींच्या राज्यात खासदारपण चूल वापरू लागल्या, व्वा मोदीजी व्वा!’
तमाशा कलावंत यांच्यासाठी वेळोवेळी हे दोन्ही कलावंत धावून जातात. राष्ट्रवादी सांस्कृतिकच्या माध्यमातून तमाशा कलावंतांसाठी यापेक्षा ही मोठे काम ते दोघेही इथून पुढे करणार आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीररीत्या प्रवेश होईल अशी माहिती यावेळी बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार, रघुवीर खेडकर व मंगलाताई यांचा आज प्राथमिक स्वरूपात प्रवेश करून घेण्यात आला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे, वृद्ध कलावंत मानधन कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कोठावळे, राज्य समन्वयक संतोष साखरे, प्रदेश सरचिटणीस मंगेश मोरे हे यावेळी उपस्थित होते.
राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपकडून ‘ही’ प्रतिक्रिया

Source link

Ajit Pawar Punelavni samradni mangala bansodemangala bansode biographymangala bansode mulakatmangala bansode tamasha dakhvamangala bansode tamasha gan gavlanncpNCP PunePune newsRaghuveer Khedkar
Comments (0)
Add Comment