नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी कर्ज :
शिक्षण दिवसेंदिवस महागडं होत चाललं आहे. मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी सारख्या अभ्यासक्रमांबरोबरच आता शालेय शिक्षणाच्या फीचा आकडाही बरोबरी करण्याच्या मार्गावर आहे. शाळांमधील नवनवीन उपक्रम, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची फी हेही दिवसागणिक खर्चिक बनत चालले आहे.
परंतु, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, बँक ऑफ बडोदा नर्सरी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठीही कर्ज (Education Loan) उपलब्ध करून देत आहे. अशावेळी
बँक ऑफ बडोदाच्या ‘बडोदा विद्या (Baroda Vidya)’ या नावाने हे कर्ज उपलब्ध आहे. यांतर्गत तुम्ही नर्सरी पासून पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी कोणत्याही तीन टप्प्यांमध्ये शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.
कोणाला मिळणार कर्ज..?
ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नोंदणीकृत शाळांमध्ये झाला असणे गरजेचे आहे.
State Board, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड अशा कोणत्याही बोर्डाच्या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक कर्ज उपलब्ध होऊ शकते.
(वाचा :Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेताय..? त्याआधी हे नक्की वाचा)
करा या कागदपत्रांची पूर्तता :
पालक जर आपल्या पाल्याचा ऍडमिशन नर्सरी पासून बारावीपर्यंत करत असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला असणार आहे यामध्ये पालकांचे केवायसी डॉक्युमेंट्स लागतील, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेश घेतल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांचे मार्कशीट शैक्षणिक खर्चाची माहिती असलेला Statement, पालकांचा उत्पन्नाचा पुरावा बँक अकाउंट चे सहा महिन्याचे स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट आवश्यक असल्यास द्यावे लागतात.